शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

रायगडच्या किनाऱ्यांना आनंदाची लहर

By निखिल म्हात्रे | Updated: December 31, 2023 18:33 IST

मागील सात दिवस पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांवर वास्तव्यास आहेत.

 अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडच्या किनारपट्टीसह धार्मिक स्थळही सज्ज झाली आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर व महड येथील वरद-विनायकाच्या दर्शनासाठी भक्तांची नववर्षाच्या पहील्याच दिवशी मोठी गर्दी पहावयास मिळते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने अधीच खबरदारी घेतली आहे. तर पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या अलिबाग, किहीम, नागाव, आक्षी, वरसोली, मुरुड, काशिद, आवास आदी ठिकाणची एक महिना आधीच हॉटेल, काॅटेज बुकिंग फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्यावेळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला.

लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे जिल्हा आता भरून गेला आहे. मागील सात दिवस पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांवर वास्तव्यास आहेत. तर ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ शकते, तसेच त्यांना मनमानी पॅकेज घ्यावे लागू शकते. याची ही काही ठिकाणी आधीच दखल घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक पर्यटनावरच येथे जास्त भर आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, कोशिद, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवर ईयरएंड ला पर्यटनासाठी मोठी गर्दी असते. साधारण तिन लाखांहून अधिक पर्यटक चार ते पाच दिवसांत जिल्ह्याच्या किनारपट्टीला भेट देतात. यात सर्वाधिक पसंती नागाव, मुरुड काशीद या ठिकाणांना असते. महिनाभर आधीच बहुसंख्य हॉटेलचे बुकिंग फुल झालेले आहे.

याआधी एका रात्रीसाठी सर्वाधिक पॅकेज 10 हजार रुपये असायचे. मात्र यामध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ते बुकही झाले आहेत. छोटी मोठी हॉटेलही हाउसफुल झाल्याचे चित्र आहे. अलिबाग, नागाव आक्षी, किहीम, आवास, सासवणे, काशीद, दिव्याआगर, श्रीवर्धन याबरोबरच किनारपट्टीलगतच्या गावांतही निवासव्यवस्था उपलब्ध असून बहुतेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग झाल्याची माहिती आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग असे प्रकार पर्यटकांसाठी यापूर्वीच खुले केले आहेत.

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक केटरर्स, खाणावळी यांचीही लगबग सुरू आहे. मोदक,डाळ - भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटण वडे, कोंबडीवडे, तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहाराची उपलब्धता करून पर्यटकांची हौस भागविली जाणार आहे. पर्यटकांना वाहतुकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. तळीरामांवरही नजर ठेवण्यासाठी पाच पथक आहेत. बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक यावर्षी एक महिन्यापूर्वीच नववर्षाच्या जल्लोषासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अलिबाग तालुक्यातील कॉटेजेस बुक केले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी आलेल्या पर्यटकांना रूम उपलब्ध करून देता आली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासूनच पर्यटकांनी हजेरी लावली आहे. समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची जत्रा भरली आहे.राजू बानकर, एबी व्हीला, व्यावसायिक

टॅग्स :Raigadरायगड