शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 22:23 IST

Raigad News: उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडवर  जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यु करुन पुढील उपचारासाठी पुण्यातील इस्पीतळात पाठविण्यात आले आहे.

- मधुकर. ठाकूर

उरण - उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडवर  जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यु करुन पुढील उपचारासाठी पुण्यातील इस्पीतळात पाठविण्यात आले आहे. यामुळे दुर्मिळ गोल्डन जॅकलला जीव वाचविण्यात यश आले आहे.

उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडच्या दुतर्फा जागेत खारफुटी,कांदळवनाची जंगलं आहेत.या परिसरात रानडुक्करांबरोबरच गोल्डन जॅकलच्या कळपांचीही रेलचेल असते.खारफुटी,कांदळवनांच्या जंगलात खेकडे, मासळी आदी आवडणारे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी  गोल्डन जॅकल कळपाने शिकारीला येतात. सोमवारी (३१) दुपारच्या सुमारास असाच एक गोल्डन जॅकल जखमी अवस्थेत रस्त्यावर आढळून आला.त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रेमानाथ भोईर या गृहस्थाने त्वरित वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी,तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे सदस्य निकेतन ठाकूर ,महेश भोईर, शिवप्रसाद भेंडे यांना माहिती देऊन पाचारण केले.

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत एका नाल्यात अडकून  निपचित पडलेल्या गोल्डन जॅकलला मोठ्या प्रयासाने रेस्क्यु केले.जखमी गोल्डन जॅकलची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.माहिती मिळताच उरण विभागाचे आरएफओ नथुराम कोकरे त्यांचे सहकारी भाऊसाहेब, संजय म्हात्रे ,सुप्रिया कसबे यांनी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गोल्डन जॅकलची प्राथमिक तपासणी केली.तपासणीत त्याला मागील बाजूस मार लागल्याचे आढळून आले.त्यामुळे गोल्डन जॅकलला तत्काळ पुढील उपचारासाठी पुण्यातील रेस्क्यु इस्पीतळात पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण विभागाचे आरएफओ नथुराम कोकरे यांनी दिली.

गोल्डन जॅकल भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सकाळच्या सुमारास जखमी झाले असावे.त्यानंतर घाबरून बिथरलेल्या जॅकलने नाल्यात आश्रय घेतला असावा.गोल्डन जॅकल वाहनाच्या धडकेत की आणखी कशामुळे जखमी झाला हे तपासणीनंतरच उघडकीस येईल असेही आरएफओ नथुराम कोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडwildlifeवन्यजीव