शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: उरणमध्ये भव्य शोभायात्रा, हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या रामभक्तांनी आनंद लुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 19:33 IST

Raigad: अयोध्येत सोमवारी राममंदिरात झालेल्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर  अवघं उरण राममय झाला होता.रामनामाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त आबालवृद्ध सहभागी झाले होते.

-  मधुकर ठाकूर उरण - अयोध्येत सोमवारी राममंदिरात झालेल्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर  अवघं उरण राममय झाला होता.रामनामाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त आबालवृद्ध सहभागी झाले होते.

राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने दोन दिवसांपासूनच उरणमधील रस्ते, मंदिरांची स्वच्छता करण्यात रामभक्त गुंतले होते.रस्तोरस्ती सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.उरण परिसरातील विविध देवीदेवतांच्या मंदिरांवर विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती.उरण शहरातील राममंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

सोमवारी सकाळी दहा वाजता उरण शहरातील राममंदिरापासुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.डीजे,लेझीम, बॅण्डच्या तालावर आणि रामनामाचा जयघोष करीत या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने स्त्री,पुरुष, विद्यार्थी, आबालवृद्ध सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले हजारो रामभक्त देहभान विसरून गाण्यांवर उत्साहाने बेभान होऊन नाचत होते.शोभयात्रेत अनेकांनी राम-लक्ष्मण, सीता,हनुमान आदींच्या वेशभूषा केल्या होत्या.दोन तासांहून अधिक तास काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार महेश बालदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

सोमवारी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवून शेकडो व्यापारी शोभायात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे उरणची बाजारपेठ सोमवारी दुपारपर्यंत सुनसान झाली होती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी गणपती चौकात भव्य एलएडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो नागरिकांनी अयोध्येतील श्री रामाच्या मुर्तीच्या आयोजित प्राणप्रतिष्ठा थेट प्रक्षेपण सोहळ्याचा एलएडी स्क्रीनवरुन आनंद लुटला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRaigadरायगड