शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या शेतकऱ्याच्या १४०० चौमी भुखंड फसवणुकीप्रकरणी वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 20:07 IST

सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

उरण : सिडकोच्या साडेबारा टक्के योजने अंतर्गत  शेतकऱ्याला देण्यात आलेला  १४०० चौ.मी. चा भुखंड फिफ्टी-फिप्टी तत्वावर विकास करण्यासाठी दिलेला असताना शेतकऱ्याला अंधारात ठेवून परस्पर विक्री करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या    तिघांविरुद्ध उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उरण तालुक्यातील बोकडवीरा गावातील शेतकरी चंद्रकांत पाटील (६५) यांना सिडकोच्या साडेबारा टक्के योजने अंतर्गत २००८ साली १४०० चौ.मी. भुखंड देण्यात आला होता. १४०० चौ.मी. चा भुखंड शेतकऱ्यांनी फिफ्टी-फिप्टी तत्वावर विकास करण्यासाठी करारपत्र तयार करून ॲड. हर्षल पाटील आणि ॲड.मेघनाथ पाटील या पिता पुत्रांकडे देण्यात आला होता.मात्र शेतकऱ्यांला अंधारात ठेवून विकासकाने कोट्यावधी किंमतीचा भुखंड सी-वुड-नवीमुंबई येथील बिल्डर संजय म्हात्रे यांना विक्री करण्याचा प्रयत्न सुरु केला होता.या फसवणूकीची कुणकुण लागल्याने चंद्रकांत पाटील यांनी सिव्हिल मॅटर असल्याने उरण न्यायालयात दावा दाखल केला होता.

सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.उरण न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पनवेल येथील सेशन कोर्टात दाद मागितली होती. शेतकऱ्यांतर्फे ॲड. असीत चावरे आणि ॲड. तन्वीर  पटेल यांनी कोर्टात युक्तिवाद करुन शेतकऱ्याची न्याय बाजू मांडली.सुनावणीनंतर पनवेल सत्र न्यायालयानेही  उरण न्यायालयाचा निर्णय कायम करत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आणि शेतकरी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिस ठाण्यात २४ एप्रिल  २०२३ रोजी ॲड. हर्षल पाटील आणि ॲड.मेघनाथ पाटील या पिता-पुत्रांसह ग्रीन एंटरप्राईसचे मालक संजय म्हात्रे आदी तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.

टॅग्स :cidcoसिडकोfraudधोकेबाजी