शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारनिर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण; फळ लागवड मोहिमेतून मिळतो रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:55 IST

मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला.

दत्ता म्हात्रेपेण : फळ लागवड योजना रोजगार हमी योजनेस समाविष्ट केल्याने रायगड जिल्ह्यात या योजनेतून रोजगार उपलब्ध होण्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे.

कोकणात तसेच रायगडात रोजगार हमी योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; परंतु रोजगार निर्मितीच्या अभावी फळबागाही लागवड योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन २ लाख ३८ हजार ९९३ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मजुरांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना देखील बाजारात मंदी असल्याने नाका कामगारांना मिळणारे ४०० ते ५०० रुपयांची मजुरीअभावी त्यांना माघारी परत फिरावे लागत होते. मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला. दिवसापोटी मिळणारे मजुरी काम नसलेल्या हंगामात त्यांना या योजनतून उपलब्ध झाली. दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरीचा दर मिळाला व कामाचा ही एवढा मोठा ताण नसल्याने फळबाग लागवड योजनेचे कामात मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता आले.

जिल्ह्याला रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी २ लाख ४७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते दिलेल्या उद्दिष्टाच्या ९० टक्के भरते. जिल्ह्यात १३ हजार ३६५ मजुरांनी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची मागणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६५६ मजुरांना रोजगार उपलब्ध झाले.

अकुशल कामगारांना कामजिल्ह्यात औद्योगिकीकरण झालेले असताना कंपन्यांच्या साइटवर मिळणारा रोजगार अकुशल कामगारांसाठी मोठा आहे. परंतु कामाअभावी घरी बसण्यापेक्षा या योजनेत काम करण्यावर अकुशल मजुरांनी भर दिल्याने सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेला रोजगार निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले.