शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

उरणमध्ये ९० घरे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:08 IST

उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.

उरण : उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.मुंबई घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. उरण नगरपरिषदेच्या हद्दीत बाजारपेठ, मोरा, भवरा, बोरी, कुंभारवाडा आदी ठिकाणी ९० घरे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणानंतर आढळून आले आहे. उनपने केलेल्या सर्व्हेनंतर धोकादायक ठरविण्यात आलेल्या ९० घरांमध्ये कौलारू घरे ८३, एक मजली वाडे अथवा बैठ्या चाळी ४, तर ३ इमारतींचा समावेश असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. १९६० सालापूर्वी असलेली धोकादायक घरे, वाडे, चाळी, इमारतींना उरण नगरपरिषदेने अनेकदा नोटिसाही बजावल्या आहेत. अतिवृष्टी अथवा खराब हवामानामुळे घरे, इमारती कोसळण्याची भीती असल्याने उनपने शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र, उनपच्या नोटिशींनंतर धोकादायक घरात सध्या ४३ कुटुंबे वास्तव करीत असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली.बहुतांश धोकादायक घरांमध्ये एक मजली कौलारू घरे अथवा चाळी, वाडेच आहेत. धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करीत असलेले बहुतांश कुटुंबे अनेक वर्षांपासून भाडोत्री म्हणूनच राहत आहेत. काही पगडी पद्धतीने, तर काही नाममात्र ५० ते ५०० रुपये मासिक भाडे देऊन अनेक वर्षांपासून राहात आहेत. अनेक घरांचे मालक हयात नाहीत. त्यामुळे तर मालकांच्या पश्चात असलेल्या घरमालकांच्या वारसांना भाड्यांनी दिलेल्या घरांची दुरुस्ती करण्यात स्वारस्य नाही. घरे, इमारतींच्या दुरुस्तीची भाडोत्र्यांची इच्छा असली तरी त्यासाठी घरमालक परवानगी देण्यास तयार नाहीत. तर केवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी आर्थिक सुबत्ता असतानाही अनेक भाडोत्री कुटुंबे जीव मुठीत घेऊन धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करून आहेत. तर खरोखरच भाड्याने घर घेण्याची अथवा नवीन घर घेण्याची ऐपत नसल्यानेच काही गरीब गरजू कुटुंबे नाइलाजास्तव धोकादायक घरात जीव मुठीत घेऊन राहात आहेत. घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील मालकी हक्काबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील वादाचे अनेक खटले निवाड्यासाठी न्यायालयात दाखल झालेले आहेत.वादात अडकलेली अशी अनेक घरे, चाळी, इमारतींचा वापर बंद करून मालकांनी त्यांना टाळे ठोकणेच पसंत केले असल्याचीही अनेक उदाहरणे असल्याची माहितीही उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. मात्र, दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडल्यास नोटिसा बजावूनही धोकादायक घरांमध्ये राहणाºया ४३ कुटुंबीयांबाबत उनप नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.