शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता, शिक्षणाधिकारी अडचणीत; संबंधितांवर कारवाई करण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 04:36 IST

राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील शाळांनी त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिका-यांना हाताशी धरून ९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता दिली होती. परंतु सरकारला याबाबत समजताच अनियमितरीत्या वैयक्तिक मान्यता दिलेल्यांवर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिका-यांना दिले.

 - आविष्कार देसाई अलिबाग : राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील शाळांनी त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिका-यांना हाताशी धरून ९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता दिली होती. परंतु सरकारला याबाबत समजताच अनियमितरीत्या वैयक्तिक मान्यता दिलेल्यांवर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिका-यांना दिले. एका शिक्षणाधिका-यांनी दिलेले आदेश दुसºया शिक्षणाधिकाºयांना रद्द करता येत नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांची अडचण झाली आहे. त्यासाठी त्यांनी अनियमिततेचे प्रकरण उपसंचालकांकडे सोपवले आहे. त्यामुळे आता उपसंचालकांना कारवाईचा बडगा उगारावा लागेल.शिक्षण आयुक्त विभागाने बंदीच्या कालावधीत अनियमितरीत्या दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रकरणांची तपासणी केली. यात मुंबई (प) २१२, रायगड ६३, सातारा २२, नागपूर ५४, अकोला ४६, जळगाव ९०, मुंबई (द) ९, बीड जिल्ह्यामध्ये १३१, जालना ११, नांदेड १२३, नाशिक १४२ असे ९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आढळले होते.आता शिक्षण उपसंचालकांकडे याबाबत कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येतील, असे शिक्षणाधिकारी सुनील सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या शाळेतील शिक्षकांनी कायदे धाब्यावर बसवलेले प्रस्ताव पाठविले होते त्यांना नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षक