शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

बलापमध्ये जोपासली जातेय ‘रीघवनी’ची ८० वर्षांहून जुनी परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:06 IST

सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत. कोकणात या प्रथेला गावपळण असे म्हणतात. याच तालुक्यातील राबगाव गावामध्ये देखील अशी रीघवनीची प्रथा होती, परंतु आता गावाची लोकसंख्या वाढल्याने त्यांनी ती प्रथा बंद केली. दर नऊ वर्षांनी येणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव गुराढोरासह सोडतात. गावाबाहेर वेशीवर शेतात तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या करून साधारण तीन दिवस राहतात. गावात पूर्णत: शुकशुकाट असतो.

ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी ७ वाजता बाहेर पडले आहेत. साधारण ३५झोपड्या बांधल्या आहेत. गावातील अंदाजे ३०० आबालवृद्ध व तरुण तेथे राहत आहेत. शनिवारी रात्री गावात प्रमुख लोक जाऊन मानपान आणि पारंपरिक विधी करणार आहेत. त्यानंतर रविवारी ५ मे रोजी सर्व गावकरी पुन्हा आपापल्या घरी जाणार आहेत. अशी ही जुनी प्रथा आजही जोपासली जात आहे. सध्याच्या तरुण पिढीला हा युक्तिवाद पटत नाही. तरीसुद्धा ते मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

या गावात उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. ते सांगतात की, तीन दिवस गाव मोकळे राहिल्यामुळे प्रदूषण, रोगराई अशा काही गोष्टी गावात असतील तर त्यांचा नायनाट होतो. लोक मोकळ्यावर जाऊन राहतात, तिथे त्यांना वेगळे शेजारी लाभतात. त्यातून एकी निर्माण होते. एक इव्हेंट म्हणून आता हे साजरे केले जाते. निमित्त जरी रीघवनीचे असले तरीसुद्धा जशी शहरांत माणसे आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस बाहेर जातात, तसेच येथील प्रजा बदल म्हणून गावाबाहेर जाऊन राहते. यात अंधश्रद्धा अजिबात नाही, तर एका पुरातन परंपरेचे काटेकोरपणे जतन करीत असल्याचे येथील ग्रामस्थ प्रमोद खरिवले यांनी सांगितले. पूर्वीच्या लोकांचा उद्देश हाच असेल की रोगराई, प्रदूषण यापासून गाव तीन दिवस मुक्त व्हावा आणि नंतर परत नव्या उत्साहाने शुद्ध हवेत येऊन राहावे.

आजही मोठ्या उत्साहाने ‘रीघवनी’ची ही परंपरा जपली जाते. ग्रामदैवत श्रीरामेश्वरावर येथील लोकांची नितांत श्रद्धा आहे. पूर्वी गावात साथीचे रोग आल्यावर त्या रोगांचे विषाणू-जीवाणू प्रसार होऊ नये म्हणून सर्व लोक गावाबाहेर यायचे. मात्र त्यानंतर याला भूतप्रेत ही अंधश्रद्धा जोडली गेली. मात्र आम्ही तरुणांनी या परंपरेचे कारण पूर्वीचे साथीचे रोग असल्याचे शोधले आहे. या पाठीमागे कोणती भीती किंवा अंधश्रद्धा किंवा अघोरी प्रथा नाही. - किशोर खरीवले, उपसरपंच, बलाप

टॅग्स :Raigadरायगडsindhudurgसिंधुदुर्ग