२१ हजार प्रकरणांत ८ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:37 PM2020-02-12T23:37:45+5:302020-02-12T23:37:59+5:30

राष्ट्रीय लोकअदालत : निपटारा करण्यात रायगड जिल्हा पुन्हा दुसऱ्या स्थानी

8 crore recovered in 21 thousand cases | २१ हजार प्रकरणांत ८ कोटी वसूल

२१ हजार प्रकरणांत ८ कोटी वसूल

Next

अलिबाग : प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांचा निपटारा तत्काळ व्हावा, यासाठी राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच पार पडली. २१ हजार २९३ प्रकरणांमध्ये तडजोड करून तब्बल आठ कोटी ४८ लाख ४९ हजार ४२७ इतक्या रकमेची पक्षकारांना वसुली करून देण्यात यश आले आहे. सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करून रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीय
क्र मांक प्राप्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्हा सातत्याने पहिल्या ते तिसºया क्रमांकावर आहे.
पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये भूसंपादन, मोटार अपघात, दिवाणी, कलम १३८ एन.आय. अ‍ॅक्ट, विवाह, तडजोडपात्र फौजदारी खटले, दिवाणी-फौजदारी अपील, सहकार न्यायालय आणि कामगार न्यायालय, बँका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टीसंदर्भातील अशी अनेक वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये कामकाजाचा वेगाने निपटारा होण्यासाठी एकूण ३९ कक्ष उभारण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पाच वर्षांपेक्षा जुनी अशी एकूण ५२ प्रकरणे तसेच जुनी १० ते ३० वर्षे जुनी १२ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सचिव रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली. तसेच अलिबाग तालुक्यातील मल्याण, उसर, कुणे या गावांतील एमआयडीसीकरिता संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा वाद मागील २० वर्षांपासून प्रलंबित होता. हा वाद लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवून शेतकºयांना वाढीव नुकसानभरपाई मिळवून देण्यात आल्याकडे वरिष्ठ न्यायाधीश स्वामी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीयकृत बँका, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येऊन सहभाग नोंदविला.
भरघोस प्रतिसाद
जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, पदाधिकारी, न्यायिक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ मंडळ, विधि स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले पुढील लोकअदालतीला असाच भरघोस प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी व्यक्त केली.
मुरुड तालुक्यातील प्रलंबित सहा प्रकरणे निकाली
मुरुड : येथील दिवाणी न्यायालयात नुकत्याच आयोजित केलेल्या लोकन्यायालयात प्रलंबित असलेले एक दिवाणी व पाच फौजदारी गुन्हांचा समावेश असलेली प्रकरणे निकाली निघाली. राजपुरी येथील वेलकम पर्यटक संस्था व जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेमधील वाद विकोपाला जाऊन लोक अदालतीमध्ये हा वाद मिटवला गेला आहे. वेलकम सोसायटीचे चेरमन जावेद कारभारी यांना व्यवसायाच्या वैमनस्यातून पायाला जोरदार दुखापत करण्यात आली होती. सर्व आरोपींवर ३२६ सारखा गंभीर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. असे असतानासुद्धा जावेद कारभारी यांनी मोठे मन करून लोकअदालतीमध्ये हा वाद मिटवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. हे प्रकरण सामंजस्यामुळे मिटल्याने राजपुरी मोहल्ल्यातील सामंजस्य व शांतता अबाधित राखली जाणार आहे. राजपुरी ते जंजिरा प्रवेशद्वारापर्यंतची पर्यटक वाहतूक आता निर्विघ्न पार पडणार आहे. वस्तुत: जावेद कारभारी यांना गंभीर जखमी केल्याने १२ ते १३ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केल्यामुळे मोहल्ल्याची शांतता भंग पावली होती. तथापि, लोकन्यायालयाची शिष्टाई कामी आली असून, येथील वाद आता कायमचा मिटला आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी जावेद कारभारी व इस्माइल अदमाने यांना गुलाब पुष्प देऊन समेट घडवून आणला आहे. मुरुड पंचायत समिती व मुरुड नगरपरिषद यांची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची एक कोटी ५० हजार रुपयांची वसूल करण्यात लोकन्यायालयाला यश मिळाले आहे. पंच म्हणून अ‍ॅड. डी. एन. पाटील व अ‍ॅड. मृणाल खोत यांनी कामकाज पाहिले. या वेळी बार असोसिएशनचे अ‍ॅड. संजय जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: 8 crore recovered in 21 thousand cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.