शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेच्या जतनासाठी ६२ मुले सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:53 IST

जैवविविधतेच्या बाबतीत ‘पश्चिम घाट’ आघाडीवर आहे. देशाच्या सहा राज्यांत पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी

जयंत धुळप  अलिबाग : जैवविविधतेच्या बाबतीत ‘पश्चिम घाट’ आघाडीवर आहे. देशाच्या सहा राज्यांत पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटके विमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समूह राहतात. त्यांचे संवर्धन करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांतील आदिवासी मुले वारसा जतनाकरिता सज्ज झाल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली आहे.जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटात कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड येथील अनेक आदिवासी व बिगरआदिवासी गाव समूहांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील खाणी, अभयारण्याच्या सभोवताली झालेली वृक्षतोड, परंपरागत जंगलनिवासींची बदललेली शेती पद्धती व वन्य प्राण्यांची शिकार या सारख्या अनेक बाबींमुळे पश्चिम घाटातील नैसर्गिक संतुलन वेगाने ढासळत आहे. याचा विपरित परिणाम म्हणून भूस्सखलन, महापूर, अतिवृष्टी तसेच दुष्काळ आदीसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.कर्नाटक राज्यातील होश्यागडी येथील जंगलात ‘पश्चिम घाट वाचवा’ या अभियानामार्फत २५ ते २९ एप्रिल दरम्यान किशोरवयीन मुला-मुलींचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एन्वायरमेंटल स्टडी सेंटर व प्रकृती या दोन संस्थांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.कोकणातील१६ मुले सक्रियकोकणातून अंकुर ट्रस्ट या संस्थेमार्फत आदिवासी, धनगर तर चाइल्ड हेवन येथील निराश्रीत मुले, असे एकूण १६ किशोरवयीन मुलांचा चमू व कर्मचारी सनीश म्हात्रे, संजय नाईक तसेच गटप्रमुख ईला गोरे व गार्गी पाटील आदी सहभागी झाले होते. कर्नाटकातल्या या प्रशिक्षित मुलांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत संपूर्ण माहिती येथे देऊन, हा जैवविविधतेचा वारसा जतन करण्याकरिता सक्रिय होण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगीतले.६२ आदिवासी मुलांचे नेटवर्क वृद्धिंगत करणारपश्चिम घाट वाचवा या अभियानातील आपले भावी संकल्प देखील या मुलांनी तयार केले असून महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील या ६२ आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धिंगत करण्याचा त्यांचा संकल्प महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. पाटील यांनी अखेरीस सांगितले.