शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 06:00 IST

उरण येथील जेएनपीटी सेझने ४४ एकर जागा दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया अम्स हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि. या बंदराला ५६६.३ कोटी या भावाने ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला आहे

उरण - उरण येथील जेएनपीटी सेझने ४४ एकर जागा दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया अम्स हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि. या बंदराला ५६६.३ कोटी या भावाने ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला आहे, तसेच एसएमई विभागाची ३१ एकर जागा १५ गुंतवणूकदारांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी दिली.जेएनपीटीच्या विशेष आर्थिक क्षेत्राने ६८४ एकर जागा आहे. रोजगाराला चालना देणे, गुंतवणूकदारांत वाढ करणे, या प्रमुख उद्देशांबरोबच जेएनपीटी बंदराची कंटनेर हाताळणीची क्षमता वाढविणे, याचाही यात समावेश आहे. आतापर्यंत जेएनपीटीने ७५ एकर जागा ६३० कोटी रु पयांनी गुंतवणूकदारांना ६० वर्षांसाठी या आधीच भाडेतत्त्वावर दिली आहे.जेएनपीटीच्या विशेष आर्थिक क्षेत्रात अनेक उद्योजक, लॉजिस्टिक कंपन्या आर्थिक गुंतवणूक करण्यात उत्सुक असून, चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनाने केला आहे.जेएनपीटी सेझ मुंबईच्या जवळ आहे. नवीन येऊ घातलेले नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ हे जेमतेम १५ किमी अंतरावर असून, जेएनपीटी बंदरापासून केवळ पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथे जास्तीतजास्त गुंतवणूक होऊ शकते, असे जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी सांगितले.कला व क्रीडा क्षेत्रासही अधिक चालना मिळावी, यासाठी जेएनपीटी प्रशासनाने विशेष आर्थिक क्षेत्रात ५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी मुबलक पाण्याचा पुरवठा, नियमित वीजपुरवठा, माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे, ग्राहक कार्यालय, प्रशासन कार्यालय, प्रशिक्षण केंद्रे, वाहन तळे, सांडपाणी प्रक्रि या प्रकल्प आदी गोष्टींची तरतूद केल्याची माहिती बन्सल यांनी दिली.सल्लागारांची विशेष नेमणूकजेएनपीटीने या सर्व कामांसाठी स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी नेमलेलीअसून, इमारती, तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एपीसी आणि पीएमसी यासारख्या सल्लागारांची विशेष नेमणूक केलेली आहे.आतापर्यंत जेएनपीटी सेझ प्रकल्पाचे ३५ टक्के काम झालेले असून, जुलै २०१९ पर्यंत जेएनपीटी सेझ पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी अपेक्षाही जेएनपीटी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगड