शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

५०० महिला शेतकरी खाडीत आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:38 IST

अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक झाल्या.

- जयंत धुळपअलिबाग - अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक झाल्या. अनेक चर्चा, विनंत्या, आंदोलने,उपोषणे करून देखील गेल्या तीन वर्षांत संबंधित जेएसडब्ल्यू कंपनी वा शासन यापैकी कुणीही फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती केली नाही. या साºया परिस्थितीस कंटाळून अखेरचा पर्याय म्हणून, येत्या १७ एप्रिलपर्यंत फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्ती कामास प्रारंभ झाला नाही, तर त्याच फुटलेल्या बंधाºयातून वाहणाºया खाडीच्या पाण्यातच ठिय्या देऊन बसून राहाण्याचा निर्णय घेतला आहे.संरक्षक फुटीने बाधित झालेल्या आनंदनगर, देवळी, जुई, खारपाले, मौजेपाले, म्हैसबाड, ढोंबी जांभेळा, चीर्बी, घात, माचेला या अकरा गावांतील महिला शेतकºयांच्या निर्णय मेळाव्याचे आयोजन गुरुवारी खारपाले गावात कष्टकरी महिला आघाडी, खारडोंगर मेहनत आघाडी, हांदेकरी महिला, जोळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सुनंदा चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी पांडुरंग तुरे,मंजुळा पाटील,काराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन पाटील, सदस्या प्रतिभा म्हात्रे, दर्शन पाटील, प्रतिभा कोठेकर, सुरेखा ठाकूर, अमिता ठाकूर, धा. म. पाटील, रघुनाथ माधवी आदी उपस्थित होते, अशी माहिती या शेतकरी लढ्याचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.फुटलेल्या संरक्षक बंधाºयाजवळील शासकीय जमीन स.नं.९४ बाबत हरित न्यायालयात दाखल एक याचिका, कांदळवने अशी कारणे पुढे करून जेएसडब्ल्यू कंपनीने वा शासनाने बंधारा दुरुस्तीचे काम गेल्या २७ नोव्हेंबर २०१५ पासून केले नाही. परिणामी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांतून या ११ गावांच्या शेतजमिनीत खाडीमधून दर अमावस्या व पौर्णिमेच्या उधाणाला खारे पाणी शिरत आहे.दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे शिष्टमंडळ, उपोषण, जिल्हाधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा पाहणी दौरा, तहसीलदार व प्रांत अधिकाºयांचा दौरा, रास्ता रोको अशी आंदोलने शांततेच्या मार्गाने केली, परंतु दुरुस्तीचे काम अद्याप सुरूझाले नसल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवकर यांनी सांगितले....तर जबाबदारी अधिकाºयांची१७ एप्रिलपर्यंत फुटलेल्या संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर फुटलेल्या बंधाºयातून वाहणाºया खाडीच्या पाण्यात आम्ही बसणार आहोत. या वेळी आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन म्हणून पेण प्रांताधिकारी, खारभूमी खाते आणि जेएसडब्ल्यू कंपनीची राहील.जेएसडब्ल्यू कंपनीने बंधाºयाची दुरुस्ती करण्याकरिता, फुटलेल्या संरक्षक बंधाºयापर्यंत जाण्याकरिता आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब करून, हरित न्यायालयाचा २७ आॅक्टोबर २०१५चा आदेश विचारात घेवून कोणत्याही परिस्थितीत कांदळवनांचे कोणतेही नुकसान होणार नाही,याची खबरदारी घेवून आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.- प्रतिमा पुदलवाड, पेण प्रांताधिकारी

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या