शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

५०० फूट दरीत कोसळली रिक्षा

By admin | Updated: August 14, 2015 23:40 IST

खोपोलीजवळ बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ ५०० फूट खोल दरीत रिक्षा कोसळून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून

खालापूर : खोपोलीजवळ बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ ५०० फूट खोल दरीत रिक्षा कोसळून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी राजस्थान येथून फिरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. लोणावळा व खंडाळा फिरून झाल्यानंतर अ‍ॅडलॅबला जात असताना शुक्र वारी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला.राजस्थान येथून अविनाश अशोक जयसिंग (२६), पत्नी मिली अविनाश जयसिंग (२४) व मित्र राजेंद्र सरदार निर्मलसिंग मखिजा (२६) व अमृतकौर राजेंद्रसिंग मखिजा (२३) यांच्यासह महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. लोणावळा व खंडाळ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर हे दोन्ही कुटुंब लोणावळा येथून खाजगी रिक्षा करून अ‍ॅडलॅब इमॅजिका हे थीम पार्क पाहण्यासाठी शुक्र वारी सकाळी येत होते. बोरघाटातील अवघड उतारावर रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने शिंग्रोबा मंदिराजवळ असलेल्या सुमारे ५०० फूट खोल दरीत रिक्षा कोसळली.या अपघातात अविनाश जयसिंग यांचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकासह अन्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. सकाळी ११ वाजता ही घटना घडल्यानंतर खोपोली पोलीस, खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व यशवंती हायकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सतत पडणारा पाऊस व त्यामुळे निसरडी झालेली वाट यामुळे मृतदेह व जखमींना खोल दरीतून वर काढताना अडचणी येत होत्या. सकाळी सुरू झालेले बचावकार्य संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस निरीक्षक जयसिंह तांबे यांच्या पथकाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)