शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बँकॉकमध्ये ५० गणेशमूर्ती रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:58 IST

यंदा पेणमधील गणेशमूर्तींची परदेशस्थ अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

- दत्ता म्हात्रेपेण : यंदा पेणमधील गणेशमूर्तींची परदेशस्थ अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. २०१९ वर्षात उत्सवाच्या अनुषंगाने सहा महिनेअगोदरच अ‍ॅडव्हान्स बुकिंग म्हणून पेणच्या कार्यशाळांमध्ये बाप्पांच्या सुबक मूर्तींची मागणी करण्यात आली आहे. मॉरिशसपाठोपाठ आता बँकॉकमध्ये दहा फूट उंच १५ मोठ्या गणेशमूर्ती, तर दीड ते दोन फूट उंचीच्या ३५ अशा एकूण ५० गणेशमूर्ती पेण शहरातून रवाना झाल्या असल्याची माहिती मूर्तिकार दीपक समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या वर्षीचा बाप्पाचा गणेशोत्सव जरा हटके करण्याची परदेशस्थ अनिवासी भारतीयांची चढोओढ सुरू असून, मॉरिशस देशापाठोपाठ दुसरी मोठी आॅर्डर बँकॉकमध्ये झाली आहे. मार्च महिन्यातच या दोन आॅर्डर पूर्ण झाल्यामुळे कार्यशाळांमध्ये उत्साही वातावरण आहे. साधारणपणे बाप्पाची परदेशवारी ही एप्रिल अखेरीस सुरू होते ती थेट जून महिन्याच्या अंतापर्यंत. मूर्तिकार परदेशातील मागण्याच्या अनुषंगाने तयारीत असतात. मात्र, यावर्षी २०१९ च्या वर्षारंभी या आॅर्डर मिळाल्याने त्यांची पूर्तता यशस्वीपणे करण्यासाठी चित्रशाळांमधील कामगारांना भरपूर वेळ मिळाला आहे. अतिशय आकर्षक व देखण्या गणेशमूर्ती विविध कला केंद्रांत साकारल्या जात असून, बॉक्स पॅकिंगसह कंटेनर पॅकिं गसह त्या बँकॉक देशात रवाना केल्या आहेत.या दहा फूट उंचीच्या गणेशमूर्तींना रंगसंगतीमध्ये आकर्षक रंगांनी सजविल्या असून, त्यांच्या डोळ्यांची आखणी बॉडीकलर यासाठी विशेष रंगाचा वापर करण्यात आला असून, अधिक काळ टिकतील याची दक्षता घेतली असल्याचे गणेशमूर्तिकार नीलेश समेळ यांनी सांगितले.

टॅग्स :ganpatiगणपती