शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये ४७७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:29 IST

 कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध क्लुप्त्या लढवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोना संसर्गाची दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत, तर गेल्या महिनाभरापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

 कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध क्लुप्त्या लढवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोना विषाणूचा रोख कमी झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती, तर सध्या ४७७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त पनवेल महानगर पालिका क्षेत्रात ४७४ रुग्ण आढळले आहेत. तळा तालुक्यात ० तर मुरुड, म्हसळा, पोलादपूर तालुक्यात २ रुग्णांची नोंद झाली आहे.

रायगड जिल्ह्यात ५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५५ हजार ५०५ रुग्णांची संख्या पार केली आहे. २ लाख १९ हजार ७२० नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांची आजची संख्या १ हजार १५ आहे. यातील ४७७ रुग्ण हे घरीच उपचार करून घेत आहेत. त्यामुळे रुग्णांवर आलेले मानसिक दडपण कमी झाले आहे, तसेच नागरिकांमध्ये आता सजगता आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५८० जणांचा मृत्यू झाला असला, तरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आले आहे. कोरोनाचा जोर कमी झाल्याने नागरिक देखिल बिनधास्त झाले अस्ल्याचे पहावयास मिळत आहेत.

गृह विलगीकरणासाठी अटी गृह विलगीकरणासाठी राहिलेल्या रुग्णाने स्वत:ला एका रूममध्ये राहावे, घरातील इतर व्यक्तींशी संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यावी. रुग्णाला दिलेले औषधोपचार त्याने वेळेवर घ्यावे, तसेच पोषक आहार करावा. दिवसातून एकादा ऑक्सिजन लेव्हल तपासून घ्यावी. गरम पाणी प्यावे, स्वच्छता ठेवावी. रुग्णाला आरोग्य विषयक सल्ला देऊन त्याचे मानोबळ वाढविण्याचा प्रयत्न करावा. रुग्णाला सकारात्मक वातावरण मिलाले तर रुग्ण लवकर बरा होतो. तसे प्रयत्न होणे गरजेचे आहेत असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

रोज आरोग्य विभाग घेतो माहितीगृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी रोज आरोग्य विभागामार्फत रुग्णास फोन केला जातो. रुग्णाची ऑक्सिजन लेवल व त्याचे टेंम्प्रेचरची माहिती घेतली जाते.

i

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या