शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ४५ लाख रोपांची निर्मिती; सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:39 IST

यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात १६ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.

अलिबाग : राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत यावर्षी ३३ कोटी वृक्षलागवड अभियानासाठी रायगड जिल्ह्यात रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात ३० ठिकाणी रोपवाटिका तयार करून ४५ लाख ७८ हजार रोपांची निर्मिती केली आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकम यांनी दिली आहे.यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात १६ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रस्ते, कालवे, समुद्रकिनारी, गायराने, पडीक जमिनी अशा ठिकाणी वृक्षलागवडीचे नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत १३ लाख ६० हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. हे अभियान १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभाग या अभियानात जिल्ह्यातील ८०५ ग्रामपंचातींना प्रत्येकी ३२०० या प्रमाणे रोपे मोफत उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यात संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात २५ लाख ७६ हजार इतकी रोपे सामाजिक वनीकरण विभाग उपलब्ध करून देणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका तालुकानिहाय याप्रमाणे अलिबाग तालुका- किहिम, तीनविरा, खानाव, मापगाव, वरंडे, लोणोरे, पेण तालुका- रामवाडी, कामार्ली, पनवेल तालुका- वावेघर, कर्जत तालुका- लाडिवली, तलवडे, कुरुंग, खालापूर सुधागड तालुका- वलाप, राबगाव, वावर्ले, रोहा तालुका- डोलवहाळ, संभे, वरसगाव, माणगाव व तळा तालुका- पहेल, तळेगाव, बोरगाव, हवेली, महाड व पोलादपूर तालुका- वरंडोली, नांदगाव, काचले, राजेवाडी, लोजारे, मुरुड तालुका वावडुंगी, आंबोली. म्हसळा व श्रीवर्धन तालुका- सरवर, रानवली.

टॅग्स :Raigadरायगड