शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन वैभव! भिवगडावर सापडले ४० तोफगोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 23:45 IST

राजा शिवछत्रपती परिवाराकडून स्वच्छता मोहीम

- कांता हाबळे नेरळ : राजा शिवछत्रपती परिवाराकडून रायगड विभाग वर्धापन दिनानिमित्त किल्ले भिवगडावर ३० डिसेंंबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवकालीन पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढत असताना काही सदस्यांना शिवकालीन सुमारे ४० तोफ गोळे सापडले आहेत.कर्जत तालुक्यातील भिवगड उर्फ भिमगड जवळील वदप व गौरकामत या दोन गावांच्या मागे टेकडीवर उभा आहे. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून ८५० फुट आहे. गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे. कर्जतपासून ५ किलो मीटर अंतरावर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ किलो मीटवर गौरकामत गाव आहे. या दोन्ही गावांतून भिवगडावर अर्ध्या तासात जाता येते. अशा या शिवकालीन वैभवाचा ठेवा असलेल्या या किल्ल्यावर राजा शिवछपत्रपती परिवार रायगड विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम शिवछत्रपती परिवारासाठी तसेच सर्व शिवभक्तांसाठी अविस्मरणीय अशी ठरली आहे.काही सदस्यांनी शिवकालीन पाण्याच्या टाक्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी काही फुटांवर गाळ बाहेर काढत असताना लहान मोठे गोल दगड सापडण्यास सुरुवात झाली, नंतर शहानिशा केल्यानंतर आढळून आलेले हे दगड नसून शिवकालीन तोफगोळे असल्याचे समजले. गाळातून हे सर्व व्यवस्थित बाहेर काढून स्वच्छ करून ठेवण्यात आले, शिवकालीन वस्तू मिळाल्याने परिवारातील सदस्यांमध्ये उत्साह वाढला. सर्व तोफगोळे बाहेर काढले त्यावेळी त्यात ४० लहान मोठे तोफगोळे असल्याचे समोर आले. या तोफ गोळ्यांचे परिवाराच्या वतीने जतन केले जाणार असून, त्यांचा अहवाल तयार करून राज्य पुरातत्व विभागास पाठविला जाणार असल्याचे राजा शिवछत्रपती परिवाराच्या सदस्यांनी यावेळी सांगितले, तसेच यावेळी भारतीय सेनेमध्ये सेवा करत असलेल्या आणि सर्व्हिस पूर्ण झालेल्या कर्जत तालुक्यातील सैनिकांच्या सन्मानार्थ ‘वीर जवान तुझे सलाम’ हा छोटासा कार्यक्रम घेऊन भारतीय सेनेच मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.