शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटनेत ३९ तासांचे शाेधकार्य; चार कामगार बेपत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 06:44 IST

कंपनीत काम करत असलेल्या कामगारांपैकी सात कामगार जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. मात्र, अकरा कामगार बेपत्ता होते.

महाड : महाड औद्यागिक क्षेत्रातील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या औषधनिर्मिती कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला ५५ तास तर शोधमोहिमेला ३९ तास उलटले तरी बेपत्ता अकरा कामगारांपैकी चार कामगारांचा शोध अद्याप लागलेला नाही. शोधमोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.येथील औषधनिर्मिती कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता आग लागली होती.

कंपनीत काम करत असलेल्या कामगारांपैकी सात कामगार जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. मात्र, अकरा कामगार बेपत्ता होते. या बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक व इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली होती. घटनेनंतर सोळा तासांनंतर ही शोधमोहीम सुरू करण्यात आली. बारा तासांच्या प्रयत्नानंतर सात जणांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडले होते. मात्र, ओळख पटली नव्हती. त्यानंतर इतर चार कामगारांचा शोध रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता. 

शोधमोहीम सुरूचशोधमोहीम थांबवलेली नाही. बेपत्ता चार कामगारांचा शोध सुरूच आहे. एनडीआरएफचे जवान, आपदा मित्र आणि अग्निशमन दल या कारखान्यात पोकलेन, फोर क्लिप आणि क्रेनच्या सहाय्याने शोधकार्य करीत आहेत. कारखान्याच्या भिंती पाडणे, भरलेले रसायनांचे ड्रम बाजूला करणे, छप्पर तोडणे, स्फोटात कोसळलेला छत बाजूला करणे आदी काम ते करीत आहेत.

घटनास्थळी ५० पोलिस कर्मचारी तैनात शोधमोहिमेला ३९ तास पूर्ण झाले असले तरी चार कामगारांचा शोध लागलेला नाही. युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. ५० पोलिस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. जोपर्यंत या चार कामगारांचा शोध लागत नाही, तोपर्यंत शोधमोहीम सुरूच राहील.- मारुती आंधळे, पोलिस निरीक्षक, महाड एमआयडीसी पोलिस ठाणे.

टॅग्स :Raigadरायगड