शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यातील ३६ गावांना दरडींचा धोका

By admin | Updated: June 17, 2017 01:52 IST

जुलै २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांवर दरडी कोसळलेल्या दुर्घटनेला आज बारा वर्षे लोटली.

- लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : जुलै २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांवर दरडी कोसळलेल्या दुर्घटनेला आज बारा वर्षे लोटली. मात्र या दरडींचा या तालुक्याला धोका अद्यापही कायम आहे. भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३६ गावांना धोका संभवत आहे. दरडींचा हा धोका लक्षात घेऊन महसूल विभागाने महाड तालुक्यात आतापासूनच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे. मात्र आपत्ती निवारण कक्ष राबविण्यात येणाऱ्या महसूल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदारसह अनेक पदे रिक्त असल्याने ही यंत्रणा राबविण्याचे आव्हान महसूल यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. २००५ च्या नैसर्गिक आपत्तीत दरडी कोसळून महाड तालुक्यातील दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली होती. महाड शहरासह तालुक्यातील दासगाव, रायगडवाडी, कोथुर्डे, नडगावतर्फे बिरवाडी, चोचिंदे, मुठवली, वाकीबुद्रुक, चिंभावे, कोसबी, मांडले, लोअर तुडील, मुमुर्शी, शिंगरकोंड, आंबेशिवतर, कुंभेशिवतर, कोंडीवते, रावतळी, आंबिवली, कोथेरी, खैरेतर्फे तुडील, मोहोत, रोहन, मुठवली, सव, कुर्ले, पिंपळकोंड, वराठी, कुंबळे, रावतळी या गावांसह वाड्यांचा दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांमध्ये समावेश आहे. महाड तालुक्यात कार्यान्वित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, शिपाई अशा १२३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यात तहसीलदार औदुंबर पाटील यांच्यासह नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्याने महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. सुषमा सातपुते यांच्या जागी विठ्ठल इनामदार प्रांताधिकारी म्हणून नव्याने रुजू झाले आहेत. दरम्यान, या दरडप्रवण गावांवर दरडींची टांगती तलवार असल्याने पावसाळ्यात या धोकादायक गावातील ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे.