शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

३३ लाखांचा खर्च जाणार पाण्यात

By admin | Updated: June 23, 2016 03:28 IST

अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते

आविष्कार देसाई,  अलिबागअलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. परंतु आरसीएफ कंपनीने याच ठिकाणी सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. आरसीएफ प्रशासनाची ही भूमिका म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे बोलले जाते.अलिबाग शहराचे प्रवेशद्वार म्हणून चेंढरे-पिंपळभाटची ओळख आहे. याच परिसरामध्ये आरसीएफ कंपनीच्या मोठ्या संख्येने वसाहतीच्या इमारती आहेत. आरसीएफ कंपनीच्या वसाहतीलालागूनच सुमारे २०० मीटर लांबीची मोकळी जागा आहे. सध्या ती जागा सार्वजनिक बांधकाम खाते, तर काही नागरिकांच्या मालकीची आहे. चेंढरे ग्रामपंचायतीने त्यांना अ‍ॅसेसमेंटही दिले आहे. ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनाही प्रशासनाने नोटीस पाठविल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणही झालेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.याच जागेवर आरसीएफ कंपनी प्रशासनाने सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेत तेथे कामालाही सुरु वात केली आहे. यासाठी ३३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामाध्यमातून तेथे गार्डन, वृक्षलागवड, विजेचे दिवे, बसण्यासाठी बाकडे, ड्रेनेज यासह अन्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. आरसीएफने घेतलेला निर्णय चांगला असला, तरी हीच जागा अलिबाग-वडखळ मार्गाच्या चौपदरी करणात जाणार आहे. तेथील कामाला लवकरच सुरुवातही होणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे ३०० कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. अलिबाग-वडखळ या महामार्गामुळे यातील अंतर हे केवळ १५ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. एवढ्या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला येथे सुरुवात होणार असताना आरसीएफ कंपनी प्रशासन सुशोभीकरणासाठी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला येथे सुरुवात होणार असताना आरसीएफ कंपनी प्रशासन सुशोभीकरणासाठी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. सुशोभीकरणासाठी करण्यात येणारा सर्व खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. असे असताना आरसीएफ कंपनी सुशोभीकरणाचा हट्ट का धरते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी जोर धरीत आहे.