शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी ३० कोटींचे वाटप

By admin | Updated: June 29, 2017 02:56 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या जमिनीचे संपादन होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला

सिकंदर अनवारे । लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या जमिनीचे संपादन होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला, तसेच गावाशेजारी राहणाऱ्या वस्तीतील घर मालकांना त्यांच्या इमारतीचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली असून, महाड तालुक्यातील वीर, दासगाव, वहूर अशा तीन गावांना तीन टप्प्यांत ३० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक खातेदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. वारस नोंदी, मृतांची नोंद कमी करणे, परदेशात असलेले नागरिक व बँकेत खाते नसणे, अशा अनेक अडचणींमुळे जवळपास ५० टक्के पैसा शासनाच्या खात्यात पडून राहिला आहे. इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्याच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या टप्प्याच्या कामाची निविदा एल अ‍ॅण्ड टी या कंपनीने घेतली आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या गावांचे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तसेच गाव ठिकाणी असलेल्या वस्ती ठिकाणच्या इमारती संपादित करून पैसावाटपाला सुरुवात झाली आहे. यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. महाड तालुक्यातील वीर, दासगाव, वहूर, केंबुर्ली, नडगावतर्फे बिरवाडी, चांढवे खुर्द, राजेवाडी, कांबळे तर्फे महाड, महाड शहर, गांधारपाले, चांभारखिंड ही ११ गावे मुंबई-गोवा महामार्गालगत येत असून, या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच महामार्गालगत येणारी बांधकामे केंद्र सरकारने चौपदरीकरणासाठी संपादित करून त्या त्या जागा मालकांना पैशांचे वाटप सुरू केले आहे. पहिल्या टप्प्याचे वाटप महाड तालुक्यातील वीर या गावापासून सुरुवात क रण्यात आले. या गावात ८० जागा मालकांना नोटिशी बजावण्यात आल्या होत्या. या गावांसाठी केंद्र सरकारकडून १५ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात वहूर या गावात वाटप करण्यात आले. या गावामध्ये १२३ जागामालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तर गावासाठी २३ कोटी रुपये आले आहेत. मात्र, या गावामध्येदेखील १० कोटींचे वाटप झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात दासगावमध्ये वाटप करण्यात आले असून, या ठिकाणी ९० जागा मालकांना नोटिसी बजावण्यात आल्या होत्या, येथे १९.५० कोटींचे वाटप करण्यात आले. या तीन गावांसाठी ५७.५० कोटी रुपये वाटपासाठी आले असता ३० कोटींचे वाटप पूर्ण करण्यात महाड उपविभागीय कार्यालयाला यश आले असून काम पूर्ण करण्यात आले आहे.एवढे वाटप होत असताना हे तीन गाव मिळून जवळपास ४६ टक्के एवढी रक्कम वाटपची शिल्लक राहिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अगर घर जात आहेत. अशा शेतकऱ्यांचे सात-बारा आणि मालकीविषयी कागदपत्रे यामध्ये त्रुटी असल्याने अगर अनेक व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने परदेशात असल्याने वाटपात अडथळा निर्माण झाला आहे.