शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:17 IST

टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा

श्रीवर्धन : राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील नऊ गावांसाठी तीन कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यात एकूण ७८ गावे वसलेले आहेत. वाळवंटी, धनगरमलई, कासारकोंड, वडशेत, वेळास, साखरी, कोंडविल, शेखाडी व वाकळघर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.श्रीवर्धन तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत. मारळ व वडशेत वावे या ठिकाणचे कोट्यवधी रु पयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. शेतीस पूरक वातावरण आहे; परंतु कायमस्वरूपी जलस्रोतांची कमतरता आहे. श्रीवर्धनमध्ये यंदा उन्हाळ्यात जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. कासारकोंड, साक्षी भैरी (हरिहरेश्वर), धनगरमलई, नागलोली या गावातील लोकांना पाण्यासाठी गावापासून दोन-दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी जावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दोन दिवसांत गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. वारंवार मागणी केल्यामुळे तालुक्यातील नऊ गावांना राष्ट्रीय पेयजल अंतर्गत निधी मिळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाठपुरवठा करून निधी प्राप्त करून दिला आहे .- दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड