शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

29 हजार शिक्षकांच्या पोटावर येणार पाय; कंत्राटी शिक्षक पद्धतीला विरोध, २५ सप्टेंबरला आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 07:37 IST

या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

अलिबाग : राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धत आणण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे. याचा फटका ग्रामीण भागातील २९ हजारांहून अधिक शिक्षक तसेच १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकशिक्षकी होणार आहेत. त्या शिक्षकांसोबत एक निवृत्त कंत्राटी अतिरिक्त शिक्षक नेमला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील सध्या कार्यरत असलेल्या २९ हजार ७०७ शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. केंद्राच्या बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. मात्र या कायद्याचीही पायमल्ली होणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

हे धोरण राबवून ग्रामीण दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. भविष्यात समूहशाळा सुरू करण्याची ही सुरुवात आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा घाट सरकारने घातला आहे. 

- राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

शाळांचा दर्जा घसरणार

 शासनाच्या या धोरणाचा शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथील शिक्षक भवन येथे पार पडली. बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचारविनिमय केला.

 या धोरणाचा विरोध करण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे शासकीय शाळांचा दर्जा घसरण्याची भीतीही आहे.

 या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवून २५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.