शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा स्पर्धेत २८७ विशेष विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:21 IST

रायगड जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि पेण येथील आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जागतिक

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि पेण येथील आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील १४ विशेष विद्यार्थी शाळांतील २८७ विद्यार्थ्यांनी आपला विक्रमी सहभाग दिला.पेण नगरपालिकेच्या सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात आयोजित या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. धावणे, लांब उडी, स्पॉट जॅप, गोळाफेक, सॉफ्ट बॉल थ्रो, बादलीत बॉल टाकणे आदी खेळांतून विद्यार्थ्यांनी खूप आनंद लुटला. क्रीडा स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट झाल्याबद्दल समाजकल्याण अधिकारी ए.एस. लेंडी यांनी आई डे केअरचे विशेष आभार मानले.स्पर्धेच्या सर्व नियोजनामागे आई डे केअरचे कर्मचारी, विविध शाळा, कॉलेजचे शिक्षक आणि स्वयंसेवक व हितचिंतक आदींचा सक्रिय सहभाग असल्यामुळे या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडण्यास मदत झाल्याचे आई डे केअर संस्थेच्या स्वाती मोहिते यांनी सांगितले.या वेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी एस.एस. लेंडी, सहायक सल्लागार किशोर वेखंडे, हायकल कंपनीचे विशाल पाटील आणि सिमरन शेख, रामेश्वर कन्स्ट्रशन ग्रुपचे राजू पिचीका, रोटरी क्लब आॅफ पेण ओरयनचे आशिष झिटे, रोटरी क्लब पेणचे रोहन मनोरे आदी मान्यवर उपस्थित होते.