शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान

By निखिल म्हात्रे | Updated: May 2, 2024 20:28 IST

एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे.

अलिबाग- अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यातील गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. २५६ जणांनी गृह मतदान केले असून टपाली मतदान घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत ही मतदारांनी केले आहे. एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे.निवडणूक आयोगाने या वर्षीपासून ज्येष्ठ व अपंग मतदारांची होत असलेली गैरसोय पाहता गृह मतदानाची सुविधा केली आहे. यासाठी रायगडमध्ये गेले काही दिवस नोंदणी सुरू होती.

श्रीवर्धन, गुहागर, दापोली यानंतर आज तिसऱ्या टप्प्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघांतून गृह मतदानाला गुरुवारी सुरुवात झाली. गुरुवारी २७५ मतदारांपैकी २५६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर उर्वरित ४ मे ला मतदान करणार आहेत. २७५ मतदारांसाठी २६ पथक तयार करण्यात आली होती. संध्याकाळ पर्यंत मतदान करण्याचे काम सुरु होते.

अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील गृह मतदान करणाऱ्या 275 मतदारांसाठी 26 पथक तयार करण्यात आली होती. या प्रत्येक पथकात 6 जण असे एकूण 156 अधिकारी आणि कर्मचारी आपले काम चोखपणे बजावित होते.दिव्यांगासह आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदार त्यांचा मतदानाचा अधिकार गृह मतदान करून बजावीत आहेत. मतदानासाठी मतदाराकडे पोहोचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाढला. आपल्या मनातल्या उमेदवाराला वर्षनुवर्षे मतदान केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. - मुकेश चव्हाण, अलिबाग प्रांताधिकारी.

 

टॅग्स :Votingमतदानalibaugअलिबागmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४