शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२५ दुर्मीळ हरणांना मिळाले घर

By admin | Updated: January 11, 2017 06:12 IST

उरण नौदलाच्या अनधिकृत डिअर पार्कमध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या ६१ चितळ जातीच्या दुर्मीळ हरणांपैकी २५ हरणे आता सुरक्षिततेसाठी

उरण : उरण नौदलाच्या अनधिकृत डिअर पार्कमध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या ६१ चितळ जातीच्या दुर्मीळ हरणांपैकी २५ हरणे आता सुरक्षिततेसाठी वैतरण परिमंडळ विभागातील कैरीपाडा येथे हलविली आहेत. या हरणांना नैसर्गिक आवासाची सवय व्हावी, यासाठी वनविभागाचे मागील पाच महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. डिअर पार्कमधील उर्वरित ३६ हरणेही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि वनक्षेत्रात मुक्त संचारासाठी लवकरच स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती वाइल्ड लाइफ ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक दादासाहेब शेडगे यांनी दिली. उरण येथील नौदल अधिकाऱ्यांनी २४ वर्षांपूर्वी विरंगुळा म्हणून दुर्मीळ चितळ जातीच्या तीन हरणांच्या जोड्या राणीच्या बागेतून येथील नौदलाच्या डिअर पार्कमध्ये पाळण्यासाठी आणल्या होत्या. याठिकाणी हरणांना चारा पाणी देण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी मनुष्यबळाचीही तजवीज नौदल अधिकाऱ्यांनी केली होती. मागील २४ वर्षांत हरणांची संख्या ६१ पर्यंत पोहोचली होती. पाळीव हरणांची संख्या बेसुमार वाढल्याने त्यांना स्वैरविहार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शिवाय देशाची सुरक्षा हेच महत्त्वाचे ध्येय असलेल्या नौदलाकडे हरणांच्या देखभालीकडे मनुष्यबळ वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे हरणांच्या देखाभालीकडे नौदलाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्थानिक वन अधिकाऱ्यांनीही वरिष्ठांकडे विचारणा करीत, दुर्मीळ हरणे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून नौदल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी नॅशनल पार्क, राणीची बाग येथील उद्यानातही हरणे स्थलांतरीत करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, अपुरी जागा आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे डिअर पार्कमधील ही हरणे नैसर्गिक आवासात स्थलांतरीत करण्यात विलंब होत होता.