शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये २१ शाळा अनधिकृत; पनवेल तालुक्यात सर्वाधिक शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:34 IST

जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाचा अधिकारी कायदा २००९ व महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २१ शाळा शिक्षण विभागाने अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक दहा अनधिकृत शाळा पनवेल तालुक्यात आहेत, तर अलिबाग तालुक्यात एक, पनवेल-रोहा तालुक्यांत दोन, म्हसळा तालुक्यात चार, कर्जत व मुरुड तालुक्यात प्रत्येकी दोन शाळा अनधिकृत आहेत. या संबंधित शाळाचालकांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरू करू नये, तसेच पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाचा अधिकारी कायदा २००९ व महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. पालकांनी जागरूक राहून पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत विद्यालयात घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळांमधून घेतली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालकच जबाबदार राहतील याची पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही दराडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील अनधिकृत शाळा

  • मदर केअर एज्यु.सो. किंडर ड्रिम्स प्री-स्कूल, नागाव, अलिबाग.
  • आनंदी दिनकर कोळी शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई, पनवेल
  • आरोसे इंटरनॅशनल स्कूल, वहाळ, पनवेल.
  • लेट चांगूनाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्यु. सोसायटी, वहाळ, पनवेल
  • पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल, कोपर गव्हाण, पनवेल.
  • होली स्पिरीट इंग्लिश मीडियम स्कूल, आपटा, पनवेल.
  • वेदान्त पब्लिक स्कूल, कळंबोली, पनवेल.
  • डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.सी.),पनवेल.
  • गिरीराज सिंग सोलंकी पब्लिक स्कूल, लोधीवली, पनवेल.
  • शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल आदई, सुकापूर, पनवेल.
  • कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजे, पाचनंद, पनवेल.
  • रायगड एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, खुटल, रोहा.
  • ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल, खांब, रोहा.
  • इकरा इस्लामिक स्कूल अ‍ॅण्ड मकतब, म्हसळा
  • न्यू इंग्लिश स्कूल लिपणी वावे ऊर्दू, म्हसळा.
  • अल इशान इंग्लिश स्कूल, म्हसळा.
  • सुरेश ग. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा.
  • कृष्णा सेवाभावी सामाजिक संस्था कर्जत.
  • होली ट्रीनिटी फाउंडेशन, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल वेगांव रोड, दहिवली, कर्जत.
  • रॉयल एज्यु.सो.डॉ.ए.आ.उन्ड्रे इंग्लिश मीडियम स्कूल बोर्ली-मांडला, मुरु ड.
  • अंजुमन इस्लाम जंजिरा प्री-प्रायमरी स्कूल, पंचक्रोशी, मुरुड.
टॅग्स :Schoolशाळा