शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

२१ आॅक्टोबर पोलीस हुतात्मा दिन : शहीद पोलीस जवानांना सशस्त्र सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:25 IST

शनिवार, २१ आॅक्टोबर या पोलीस हुतात्मा दिनी सकाळी ८ वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हुतात्मा स्मारकास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ३७० शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

अलिबाग : शनिवार, २१ आॅक्टोबर या पोलीस हुतात्मा दिनी सकाळी ८ वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हुतात्मा स्मारकास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ३७० शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.यावेळी ८७ पोलीस जवानांनी आपल्या बंदुकीतून आकाशात तीन फैरी झाडून हुतात्म्यांना सलामी दिली. या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे व पोलीस अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० जवान गस्त घालत असताना, दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दु:खाची छाया पसरलीहोती.वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ आॅक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.>३७० पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे वाचन२१ आॅक्टोबर १९५९पासून देशरक्षणार्थ शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या बलिदानाच्या स्मृती दरवर्षी २१ आॅक्टोबर रोजी जागृत केल्या जातात.प्रारंभी पोयनाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक ज्योती कांबळे, सायबर सेल सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी यांनी वीरगती प्राप्त झालेल्या एकूण शहीद ३७० पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे वाचन केले.रायगड जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकारी व ८७ पोलीस जवानांनी सशस्त्र संचलन करून हुतात्म्यांना मानवंदना दिली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड