शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील एक लाख घरगुती गणरायांना २१ लाख मोदकांचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:23 IST

आपल्या घरच्या मुक्कामात बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा सेवा करुन त्यांना अत्यंत संतूष्ट करण्याकरीता गरिब असो वा श्रीमंत असो प्रत्येक कोकणवासीय सर्वते प्रयत्न करीत असतो. 

- जयंत धुळप

रायगड, दि. 25 - तमाम कोककवासीयांचे गणपती हे आराध्य दैवत. गणेश चतूर्थीच्या दिवशी आगमन होवून, दिड दिवस,पाच दिवस, गौरी विसर्जन, वामनद्वादशी, अनंतचतूर्दशी आणि एकविस दिवसांच्या मुक्कामाअंती बाप्पा आपल्या गावाला परत जातात. या त्यांच्या आपल्या घरच्या मुक्कामात बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा सेवा करुन त्यांना अत्यंत संतूष्ट करण्याकरीता गरिब असो वा श्रीमंत असो प्रत्येक कोकणवासीय सर्वते प्रयत्न करीत असतो. 

त्याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे गणेशआगमनाच्या दिवशी बाप्पाला पहिला नैवेद्य तांदळाच्या उकडीच्या २१ मोदकांचाच असतो. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आणि प्रथा आहे. याच उकडीच्या २१ मोदकांच्या परंपरेच्या अनुशंगाने आज वेध घेतला असता एक अत्यंत रोचक माहिती उपलब्ध झाली आणि ती म्हणजे रायगड जिल्ह्यात शुक्रवारी गणेशआगमनाच्या दिवशी गणरायांना तब्बल २१ लाख तांदळाच्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

वर्षभराच्या तांदळाची सोय बाप्पाच करुन देतारायगड जिल्ह्यात एक लाखा पेक्षा अधिक घरगूती गणपती तर २७५ सार्वजनिक गणपती आहेत. रायगड सह संपूर्ण कोकणात जी भाताची वा तांदळाची शेती होते, ती गणपती बाप्पांच्याच आशिर्वादाने होते आणि आपल्याला वर्षभर तांदूळ कधीही तो कमी पडू देत नाही,अशी श्रद्धा कोकणातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची अनेक पिढ्यान पिढ्यांची आहे.  जो बाप्पा आपल्या वर्षभराच्या तांदळाची सोय करुन देतो, त्याला त्याच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी आपल्या शेतात पिकलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढून त्या पासून तयार केलेल्या २१ मोदकांचा नैवेद्य दाखविण्याची ही परंपरा जन्मास आली. या उकडीच्या मोदकात किनाऱ्यावरील नारळाचे खोबरे आणि गूळ यांचे सारण असते. आणि उकडीचा मोदक बाप्पाला खूप आवडतो अशीही मोठी श्रद्धा आहे.