शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

१९९ बोटी अद्याप रायगडात परतल्या नाहीत, ‘ओखी’च्या चक्रव्यूहामध्ये अडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:53 IST

‘ओखी’ वादळाने केरळ आणि तामिळनाडू राज्यांना चांगलाच तडाखा देत, हाहाकार उडवल्यानंतर आता ते महाराष्ट्राच्या दिशेन घोंघावत निघाले आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : ‘ओखी’ वादळाने केरळ आणि तामिळनाडू राज्यांना चांगलाच तडाखा देत, हाहाकार उडवल्यानंतर आता ते महाराष्ट्राच्या दिशेन घोंघावत निघाले आहे. सोमवार, मंगळवार असे सलग दोन दिवस हे वादळ तेथे थैमान घालणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचा फटका कोकणसह मुंबईलाही बसणार आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील २५० मच्छीमार बोटींपैकी १९९ बोटी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेल्याने त्या अद्याप परतलेल्या नाहीत. त्या बोटी लवकर परत न आल्यास ओखीच्या चक्रव्यूहामध्ये अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये ‘ओखी’ वादळामुळे आतापर्यंत १४ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या दिशेने ताशी ६० किलोमीटर वेगाने निघालेले हे वादळ कोकणासह मुंबईत सोमवार आणि मंगळवार या दिवशी घोंघावणार आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन तसेच तटरक्षक दलाने गोव्यापासून डहाणूपर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार ९८३ यांत्रिक बोटी आहेत, तर बिगरयांत्रिक बोटींची संख्याही १११ आहे. २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खोल समुद्रामध्ये गेल्या आहेत. त्यापैकी १९९ बोटी समुद्रामध्येच आहेत. त्यांना माघारी बोलावण्यासाठी संदेश पाठवले आहेत. मात्र, ते अद्यापही परतले नाहीत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गुजरात राज्यापर्यंत मासेमारी करण्यासाठी येथून बोटी जातात. अचानक ओखीने तडाखा दिल्याने समुद्रामध्ये अडकलेल्या बोटींवरील खलाशांसह कर्मचाºयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे १३० बोंटीवरच वायरलेस यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. खोल समुद्रात बोटी असल्याने मोबाइलवर संपर्क साधणे कठीण जात आहे. त्यामुळे ज्या बोटींना ओखीच्या तडाख्याचा संदेश प्राप्त झाला आहे. त्यांच्यामार्फत उर्वरित बोटींना संदेश पोहोचण्याची वाट बघण्यावाचून काहीच पर्याय प्रशासनाकडे राहिलेला नाही.सोमवारपासून पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रामध्ये जाण्यास तसेच मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये समुद्र खवळलेला राहणार आहे, तसेच पाऊसही पडण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.- सागर पाठक,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगडताशी ६० किलोमीटर वेगाने निघालेले वादळ कोकणात सोमवार, मंगळवारी घोंघावणारहवामान खात्याने ओखी वादळासंदर्भात दिलेल्या इशाºयानंतर रायगडमधील सर्व मच्छीमार संस्थांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. रायगडच्या समुद्रामध्ये २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी गेल्या आहेत. त्यातील ५१ परत आल्या आहेत, तर १९९ बोटी अद्यापही समुद्रामध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मज्जाव केला आहे. समुद्रकिनारी राहणाºया नागरिकांनीही सतर्क राहावे.- अविनाश नाखवा, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय‘ओखी’च्या तडाख्यामुळे पुढील तीन दिवस समुद्र खवळलेला असल्याने समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असलेली घरे, हॉटेल्स, कॉटेज यांनीही दक्ष राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.१रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८० मच्छीमार संस्था आहेत. त्यांच्याकडे छोट्या-मोठ्या अशा एकूण एक हजार ९८३ बोटी आहेत. सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाने त्यांचा एक वॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यांच्यामार्फतही त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शक्य होईल तेवढ्या लवकर माघारी येण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. २रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी समुद्र सफरीसाठी तैनात केलेल्या स्पीड बोटी, बनना बोट, एटीव्ही असे विविध साहित्य समुद्रकिनाºयावरून हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे अलिबाग बीच स्पीड बोटिंग क्लबचे प्रकाश भगत यांनी सांगितले. 

टॅग्स :fishermanमच्छीमार