शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोकण मतदार संघासाठी १९,९१८ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:42 IST

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.

अलिबाग : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. २५ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ९१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यामध्ये ३६ मतदान केंद्रे राहणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अभय यावलकर यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये सरकारी, तसेच निमसरकारी आस्थापनातील कर्मचाºयांचा समावेश आहे. या निवडणुकीतील आणखीन विशेष बाब म्हणजे मतदानाच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी वेळ आयोगाने निश्चित केली आहे.मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करु न नंतर नेरु ळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी २८ जून रोजी तेथेच होणार आहे. मतदानसंदर्भातील तक्रार निवारण करण्यासाठी सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांना निवडणुकीकरिता लागणाºया विविध परवानग्या या एकाच ठिकाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे.>एकूण मतदान केंदे्र ३६पनवेल येथे ९ मतदान केंदे्र ठेवण्यात आली आहेत. पेण, अलिबाग येथे प्रत्येकी तीन कर्जत, उरण येथे दोन, अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे.१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष सर्वाधिकनिरंजन डावखरे भाजपा, नजीब मुल्ला- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, संजय मोरे-शिवसेना या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह ११ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये अमोल पवार, अ‍ॅड. अरु ण आंबेडकर, कल्पेश किणी, गोकुळ कदम, रती जाधव, डॉमनिका पासकल डाबरे, सुवर्णा पाटील, दिलीप भोईर, मिलिंद कांबळे, सुनील तोटावार, हिंदूराव रमेश यशवंत यांचा समावेश आहे.