शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:07 IST

तालुक्यातील पाचाड, रायगडवाडी, पुनाडेवाडी, कोंझर, कोंडरान, मांघरून, वाकी, शिवथर आदी १९ गावांना वादळाचा तडाखा बसला.

दासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने महाड तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. रायगड किल्ला परिसरातील पाचाड गाव, बौद्धवाडी, मोहल्ला, पाचाड नाका येथील घरांचे वादळामुळे नुकसान झाले. महाड महसूल विभागाकडून घरांचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती महाड तहसीलचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली.महाडमध्ये मंगळवारी दुपारनंतर अचानक वादळाने आणि गारांच्या पावसाने शेतकरी आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पाचाड, रायगडवाडी, पुनाडेवाडी, कोंझर, कोंडरान, मांघरून, वाकी, शिवथर आदी १९ गावांना वादळाचा तडाखा बसला.पाचाडमधील शासकीय विश्रामगृह आणि भांडारगृहाचे पत्रे उडून गेले. कोंझर येथील अंगणवाडीचे नुकसान झाले आहे. दासगावमधील पत्रावाडीतील विनोद कर्जावकर यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. वाघोली गावात दोन घरांचे आणि गोठ्याचे नुकसान झाले. वादळाने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.महाड महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. शिवाय, महाड कृषी विभागानेही पीक नुकसान पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.आंबा उत्पादन धोक्यातच्महाड तालुक्यात वादळाने रायवळी आणि कलमी आंब्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्याकडेला असलेल्या आणि स्वमालकीचे रायवळी आंबे वादळाने गळून पडले, तर कलमी उत्पादन घेणाºया शेतकºयांनाही पावसाचा फटका बसला. कलमी आंबे आता बाजारात आणण्याच्या तयारीत असतानाच गारा पडल्याने हे आंबे खराब होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.ढगाळ वातावरणामुळे माथेरानचा पारा वाढलाच्माथेरान : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले तरी बदलत्या हवामानाचा फटका या पर्यटनस्थळालाही बसला आहे. बुधवारी माथेरानमधील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकही हैराण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी शहरात पावसाची शक्यता वर्तवली होती.

टॅग्स :MangoआंबाRainपाऊस