बस अपघातात १९ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 04:49 AM2019-11-10T04:49:16+5:302019-11-10T04:49:18+5:30

पोलादपूर-वाई-शिरूर राज्यमार्गावर शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास पोलादपूर आड येथे पंढरपूर येथील दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला.

19 passengers injured in bus accident | बस अपघातात १९ प्रवासी जखमी

बस अपघातात १९ प्रवासी जखमी

Next

पोलादपूर : पोलादपूर-वाई-शिरूर राज्यमार्गावर शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास पोलादपूर आड येथे पंढरपूर येथील दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. यात १९ प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तीन जखमींना पुढील उपचारासाठी महाडकडे रवाना करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी गावातील वारकरी व भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. ते शनिवारी सकाळी दर्शन आटपून परत असताना महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर (पोलादपूर-वाई-शिरूर राज्यमार्ग) आड गावाजवळ आले. यावेळी बसचालक नीतेश सावंत (२८ रा. चिंचली-दापोली) घाट उतरत असताना ब्रेक न लागल्याने ती वेगाने उतारावरून खाली आली आणि रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. अपघातात बसचालकासह १८ प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रहिवासी आहेत.
अपघातात शांता संजय साळवी (४३), प्रमिला साळवी (४५), प्रणाली साळवी (१९), प्रतिभा रघुराम कदम (३८), वसंत साळवी (६५), परशुराम कदम (४०), महादेव साळवी (५५), देवजी साळवी (६४), शेखर कदम (२६), शिवाजी शेलार (५०), गंगाराम गणपत साळवी (५३), सहदेव साळवी (७४), अनिता तुकाराम काजारी (४५), तुकाराम काजारी (५०), चंद्रभागा कदम (५०), रोहिणी रवींद्र काजारी (४०), पार्वती महादेव साळवी (५०), जयवंती गंगाराम साळवी (४८) या प्रवाशांसह चालक नीतेश साळवी (२८) (सर्व राहणार दिवाण खवटी, खेड, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.
।बसचालकाविरोधात गुन्हा
अपघातातील जखमींना तातडीने ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी तीन जखमींना महाडमध्ये हलविण्यात आले. यात शांता साळवी, नीतेश सावंत, पार्वती साळवी यांना पुढील उपचारासाठी महाड ट्रामा केअरमध्ये हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 19 passengers injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.