शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 23:30 IST

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते

पाली : स्टेट बँक, विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित असल्याचा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सुधागड-पाली तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे विषय लक्षात घेऊन न्याय मिळविण्यासाठी संबंधित स्टेट बँक आॅफ इंडिया पाली शाखा, कृषी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी संबंधित अधिकाºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब का झाला, त्या वेळी स्टेट बँके च्या व्यवस्थापकांनी विमा कंपनीच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला आहे, असे सांगितले.

त्यावर विमा कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आले की, कालावधीदरम्यान स्टेट बँकेने कागदपत्र न दिल्याने हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक व विमा कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात आल्याने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँक व विमा कंपनी यांना नोटीस काढून बोलाविण्यात आले. त्या वेळी कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आले की, स्टेट बँकेच्या हलगर्जीमुळेच सुधागड तालुक्यातील १४८ शेतकºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागला आहे. त्यावर १४८ शेतकºयांना ५८ लाख ३० हजार ५१८ इतकी रक्कम स्टेट बँकेने द्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निकालाद्वारे म्हटले आहे.

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते; परंतु २०२० लागला तरी शेतकºयांना या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, असे असतानाही स्टेट बँक व विमा कंपनी शेतकºयांची दिशाभूल करत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या आत पैसे स्टेट बँकेने व विमा कंपनीने न दिल्यास शेतकरी पाली येथील स्टेट बँके समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.मी, पीक विमा सन २०१७ ला भरला, त्यानंतर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेचा मला लाभ मिळेल; परंतु दोन वर्षे झाली तरी ८८ हजार ५०० रुपये विम्याची रक्कम मिळाली नाही. - सदानंद कोंडे, शेतकरी.जिल्हाधिकारी यांच्या निकालानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम शेतकºयांना मिळवून देण्यासाठी आमच्या वरिष्ठांकडून प्रक्रिया सुरू आहे. - नितीन म्हात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पालीशेतकºयांना फेब्रुवारी अखेरपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन स्टेट बँकेच्या समोर धरणे आंदोलन करू. - विलास उतेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष.

टॅग्स :Farmerशेतकरी