शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील हाणामारीत १४ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:19 IST

दिवाळी म्हणजे जुने वैर विसरून, नवे स्नेहबंध निर्माण करण्याचा सण; परंतु या दिवाळी सणाच्या काळातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

अलिबाग : दिवाळी म्हणजे जुने वैर विसरून, नवे स्नेहबंध निर्माण करण्याचा सण; परंतु या दिवाळी सणाच्या काळातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाप या गावात पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना पाच आरोपींनी झाप गावातील रस्त्यावर आडवून हाताबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादी यांच्या आईलादेखील धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पाली पोलिसांनी विविध कलमान्वये रीतसर गुन्हा दाखल केला आहे. विरोधी गटाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माथेरान येथे घोडे विक्रीची भागीदारी फिर्यादी यांनी तोडली. या गोष्टीचा मनात राग धरून गुरुवारी संध्याकाळी दोघांनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीला मारण्याची धमकी देऊन घोड्यांना दगड मारून दुखापत केली. माथेरान पोलिसांनी प्राण्यास निर्दयतेने वागविल्याप्रकरणी दोघा आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.>पाण्यावरून धक्काबुक्कीकोपरी (खालापूर) येथील फिर्यादी व आरोपी हे दोघेही एकमेकांचे शेजारी असून अंगणात आलेले नळाचे पाणी झाडूने काढीत असताना आरोपी यांनी तेथे येऊन अंगणात पाणी का उडवता, असा प्रश्न केला. या गोष्टीवरून त्यांच्यात वाद होऊन आरोपीने फिर्यादीला लाकडी फाट्याने मारहाण करून अन्य एकास शिवीगाळी व धक्काबुक्की केली.