शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘तळीये’तील १३५ घरे अपूर्ण, तीन वर्षांनंतरही ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा; आतापर्यंत ९२ घरांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:55 IST

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता.

अलिबाग :  महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन तीन वर्षांपासून रखडले आहे. सध्या येथे ९२ घरे पूर्ण झाली असून, ६६ जणांना हक्काची घरे मिळाली असली तरी १३५ घरांची कामे अपूर्ण आहेत.

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता. तर केवनाळे, सुतारवाडीत ११ जण गाडले होते. या दुर्घटनेनंतर शासनाने तळीयेसह पाच वाड्यांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २७१ घरांची पायाभरणी करण्यास सुरुवात झाली. तीन वर्षांत फक्त ९२ घरांची उभारणी झाली.

‘म्हाडा’तर्फे २६३ सदनिकांच्या बांधकामास निविदेद्वारे मंजुरी दिली. त्यानंतर कामे सुरू झाली. २७१ पैकी २२७ घरे सध्या बांधली जाणार आहेत. २२७ सदनिकांच्या भूखंडापैकी २७ सदनिकांच्या जागेवर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या २०० सदनिकांचे काम सुरू आहे. २०० पैकी सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यात ६६ तर दुसऱ्या टप्प्यातील २६, असे एकूण ९२ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यातील ६६ जणांना घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत.

इर्शाळवाडीचेच पुनर्वसन पूर्ण

खालापूरमधील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर १९ जुलै २०२३च्या रात्री दरड कोसळली. यात २७ जणांचा मृत्यू झाला. तर शोध न लागल्याने ८४ जणांचा शासनाने मृत घोषित केले. त्यानंतर ४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधली. आपदग्रस्त कुटुंबांना ३ गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ दरड घटना घडल्या. यापैकी इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात यश आले. तर, तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी, जुई, दासगाव आणि इतर ठिकाणचे पुनर्वसन अद्याप  रखडलेले आहे.

भौगोलिक सर्वेक्षण रखडले

तळीये गावातील एका वाडीने पुनर्वसन करू नका, असा ठराव दिलेला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी भौगोलिक सर्वेक्षण करून निर्णय घेऊ, असे म्हटले होते. मात्र, अजूनही भौगोलिक सर्वेक्षण झालेले नाही.

तळीये ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २२७ पैकी ९२ सदनिका पूर्ण होऊन ६६ घरांचे वाटप झाले आहे. १३५ सदनिकांचे काम सुरू आहे. ४४ सदनिका या एका गावाने पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने थांबले आहे. भौगोलिक सर्वेक्षणानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

महेश शितोळे, तहसीलदार, महाड