शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४४ जागांसाठी १३४ उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 20:21 IST

उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली माहिती

मधुकर ठाकूर, उरण :  उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि ४४ सदस्य पदासाठी शुक्रवारी (२०) शेवटच्या दिवशी १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. उरण तालुक्यातील मुदत संपुन प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आलेल्या जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.शुक्रवारी (२०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

या शेवटच्या दिवशी जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ६ तर १७ सदस्यपदासाठी ६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर १५ सदस्यपदासाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर ९ सदस्यपदासाठी २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.असे तीनही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १४ तर तीनही ग्रामपंचायतींच्या ४४ सदस्यपदासाठी १२० असे एकूण १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पुढारी, नेते,उमेदवार,त्यांचे समर्थक पक्षांचे झेंडे फडकावत एकत्रितपणे आले होते.तीनही ग्रामपंचायतींचे भाजप समर्थक उमेदवारांनी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवार आणि त्यांच्या राजकीय समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने उनप कार्यालयातील आवारात गर्दी झाली होती.

टॅग्स :uran-acउरण