शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:52 IST

गणेशोत्सवावर निवडणुकांचे सावट; जिल्ह्यात राजकीय पक्षांना प्रचार यंत्रणा राबवणे ठरणार सोपे

- आविष्कार देसाई अलिबाग : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल १२२ ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत २६ सप्टेंबर रोजी निवडणुका पार पडणार असल्याने निवडणुकांचे सावट गणेशोत्सवावर राहणार आहे, त्यामुळे उमेदवारांना प्रचार यंत्रणा राबवणे सोपे जाणार आहे.आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर सरपंचपद रिक्त असलेल्या मुरु ड-चोरढे, सुधागड-पाली, पोलादपूर-चरई या तीन ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणूक २६ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. याच कालावधीत गणेशोत्सवाची धामधूम राहणार असल्याने गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात राजकीय धुळवड पाहावयास मिळणार आहे.रायगड जिल्ह्यात होणाºया या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची नोटीस २७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागविणे आणि सादर करणे, १२ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक जाहीर करण्यात आला आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. २६ सप्टेंबर रोजी निवडणूक आणि २७ सप्टेंबर रोजी मतदान मोजणी करण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील मापगाव, कुरुळ, झिराड, रांजणखार-डावली, सातिर्जे, रेवस, परहूर या सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे.मुरुड तालुक्यातील सावली या एकाच ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पेण तालुक्यातील जावळी, वरेडी, कासू, बेणसे, झोतीरपाडा, निधवली, अंतोरे, करंबेळी-छत्तीशी, पाबळ गागोदे खु., कुहिरे या ११ गावांत निवडणुका होणार आहेत.पनवेल तालुक्यातील विचुंबे, देवद, वहाळ, गव्हाण, पोयंजे, आदई, वांगणी तर्फे वाजे, नांदगाव, पारगाव, पळस्पे या दहा ग्रामपंचायती, उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, कोप्रोली, जुई, विंधणे या चार, कर्जत तालुक्यातील आसल, माणगाव-वरेडी, शेलू, पाषाणे, पिंपळोली, मानिवली, वारे, बोरीवली, कशेळे, बीड बु. टेंभरे, मोग्रज, सावळा/हेदवली या १२ तर खालापूर तालुक्यातील नावंढे, कलोते-मोकाशी, वडगाव या तीन ग्रामपंचायतींत निवडणूक होणार आहे.रोेहे तालुक्यातील खारगाव, आरे बु., भालगाव, धोंडखार, देवकान्हे, मढाली खुर्द, ऐनवहाळ, कोलाड, पिंगळसई, कुडली, जामगाव, आंबेवाडी, वाली, पिंगोडा, वणी, वांगणी, कडसुरे, चिंचवली-अतोणे, नेहरूनगर, वरसगाव, भिसे, मेढा या ग्रामपंचायतींत सुधागड तालुक्यातील चिखलगाव, कुंभारशेत, उद्धर, नागशेत, नेणवली, वाघोशी या सहा ग्रामपंचायतींमध्ये माणगाव तालुक्यातील पोटणेर, वावेदिवाळी, विळे, वरचीवाडी, पाणसई, कोस्ते खु., दाखणे, मढेगाव, तळेगाव-गोरेगाव, सुरव-तळे या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.तळा तालुक्यातील पिटसई, मजगाव, रोवळा, बोरघर हवेली, मालुक, पन्हेळी, महागाव, सोनसडे, पढवण, काकडशेत, वरळ, वानस्ते, मेढे या १३ ग्रामपंचायतींत, महाड तालुक्यातील मांघरूण, सव, कसबेशिवथर, आंबेशिवथर, कुंभेशिवथर, जिते, दाभोळ, खर्डी, पांगारी, रेवतळे, वाकी बु., आमशेत, शिंगरकोंड या १३ ग्रामपंचायतींत, पोलादपूर तालुक्यातील सवाद, माटवण, देवळे, बोरावळे या चार ग्रामपंचायतीत तर म्हसळा तालुक्यातील मांदाटणे, खारगाव खुर्द, मेंदडी, कोळे, आंबेत या पाच ग्रामपंचायतीत निवडणुका होत आहेत.कोकणात गणेशोत्सव हा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसांपासून ते २१ दिवसांपर्यंत बाप्पाची सेवा केली जाते. प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याची जुनी परंपरा आहे. त्याचाच फायदा राजकीय पक्षांना होणार असल्याचे दिसून येते. घरोघरी गणेशाचे दर्शन घेताना त्या-त्या उमेदवारांना प्रचार यंत्रणा राबवणे सोपे जाणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा हे प्रमुख पक्ष आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकून त्यावर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आहे, त्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच रंगत येऊ लागली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतalibaugअलिबागRaigadरायगड