शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२० दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या नाममंत्राचा जयघोष

By निखिल म्हात्रे | Updated: December 7, 2022 18:21 IST

दत्त जन्मोत्सवासाठी सर्वच मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई

लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने रायगड जिल्ह्यासह परिसरातील 120 मंदिरात कोरोना काळानंतर दोन वर्षांनी दत्त जयंती साजरी करण्यात आली. सर्व भागातील दत्त मंदिरामध्ये आज भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकरून दत्तजयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात येत आहे. त्यातच मार्गशीर्ष पोर्णिमा व मार्गशीर्ष गुरुवार हे दोन वार साधत बऱ्याच ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

दत्त जन्मोत्सवासाठी शहरातील सर्वच मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई करून पहाटेपासूनच ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा गजर सुरू होता. शहराच्या विविध भागातील दत्त मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. काही मंदिरांमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. त्यामुळे लाईव्ह दर्शनाची सुविधा ही उपलब्ध झाली होती.जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या सप्ताहात विविध दत्त मंदिरात भजन, कीर्तन, पारायणे, अखंड नाम सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त मंदिर वेश्वी, अलिबाग येथील श्रीकृष्ण दत्त मंदिर, श्री  चौल येथील दत्त जयंती स्थानिक परिसरातील मंदिरात पाळणा बांधून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. फुलांची आकर्षक सजावट आणि दीपमाळांनी सजवलेल्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

अलिबाग कोळीवाड्यातील डबरी परिवारातर्फे गेल्या अनेक वर्षापासून दत्तजयंती साजरी केली जाते. या निमित्त सरकारी नियमांचे पालन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डबरी परिवारातर्फे दत्त जयंतीसाठी आज मंदीराचा गाभारा फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. तसेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :alibaugअलिबागDatta Mandirदत्त मंदिर