शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा चालले परदेशांत; पेणच्या १२ हजार मूर्ती समुद्रमार्गे परदेशात; यंदा २५ हजार गणेशमूर्तींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 07:48 IST

दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत समुद्रमार्गे बाप्पांची परदेश वारी होत असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून पेणमधील आकर्षक गणेशमूर्तींची दरवर्षी मागणी असते. या वर्षीही सुमारे २५ हजार गणेशमूर्तींची मागणी असून आतापर्यंत बारा हजार मूर्ती समुद्रमार्गे विविध देशांत पाठविण्यात आल्या आहेत. नुकतीच चार हजार गणेशमूर्तींची ऑर्डर पेणच्या दीपक कला केंद्रातून अमेरिका युके, न्यूझीलंड, थायलंड, मॉरीशस या देशांत रवाना झाली.

दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत समुद्रमार्गे बाप्पांची परदेश वारी होत असते. मान्सून अरबी समुद्रात दाखल होताच समुद्र खवळला की मूर्तींची निर्याद बंद होते. १५ मे रोजीच जेएनपीटी बंदरातून अमेरिका, युरोपकडे रवानादेखील झाल्याचे सतीश समेळ यांनी सांगितले. 

एक फूट ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे या बाप्पांच्या मूर्तीना पोहोचण्यासाठी साधारपणे महिन्याचा कालावधी लागतो. यावर्षी पंधरा दिवस उशिराने गणेशोत्सवाला प्रारंभ होईल. १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाआहे. यामुळे मूर्तिकारांना पंधरा दिवसांचा वेळ अधिक मिळाला आहे.

१४ मार्च पहिली ऑर्डर ३००० गणेशमूर्ती मॉरीशस तसेच थायलंडला रवाना झाल्या.१५ एप्रिल ५००० मूर्तींची मोठी ऑर्डर युके, न्यूझीलंड, मॉरीशस आणि थायलंडला पाठविल्या.१५ मे ४००० गणेशमूर्तींची ऑर्डर अमेरिकेसह विविध देशांत रवाना. 

यावर्षी न्यूझीलंड, थायलंड, मॉरीशस, बँकॉक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा पाठोपाठ अमेरिका, युरोपमधील इंग्लंड, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांतील अनिवासी भारतीयांकडून मोठी मागणी होती. विशेष म्हणजे चार व पाच फूट उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी मिळाली याचे समाधान निश्चित आहे. - सचिन समेळ, मूर्तिकार,  दीपक कला केंद्र पेण.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव