शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नारळ-सुपारी बागायतदारांना १२ कोटींचे पॅकेज मंजूर; १,५७६ हेक्टरवरील १७ लाख झाडांसाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:12 IST

१६ लाख ८६ हजार ७६१ झाडांचे झाले नुकसान

- आविष्कार देसाई रायगड : निसर्ग वादळातील बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एक हजार ५७६.४९ हेक्टर क्षेत्रावरील एकूण १६ लाख ८६ हजार ७६१ नारळ आणि सुपारींच्या झाडांचे नुकसान झाले होते. सरकारच्या निर्णयामुळे नुकसान भरपाईपोटी ११ कोटी ९३ लाख १६ हजार २५० रुपये मिळण्यातील अडचण आता दूर झाली आहे. मात्र, मदत तुटपुंजी असल्याचे बागायतदारांचे म्हणणे असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

३ जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाचा हाहाकार उडवला होता. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसला होता. जिल्ह्यातील घराचे, गोठ्यांचे, विजेचे पोल, विजेच्या तारा, आंबा, काजू, कोकम यांच्यासह नारळ आणि सुपारींच्या बागांचे आतोनात नुकसान झाले होते. पुढील १५ वर्षांचे बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाल्याने, प्रति झाड नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते.

सुरुवातीला नारळ आणि सुपारी हे घटक नुकसान भरपाईच्या कक्षेत येत नसल्याने खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरकारला नव्याने आदेश पारीत करायला भाग पाडले. नारळ आणि सुपारीला नुकसान भरपाई देण्याला संमती मिळाली. मात्र, नारळासाठी प्रति झाड १२७ रुपये तर सुपारीसाठी ११ रुपये मिळणार होते.

सरकारकडून देण्यात येणारी मदत अतिशय तुटपुंजी असल्याने ती वाढवून घेण्यात पुन्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांना यश आले. आता नवीन नियमानुसार प्रति नारळाच्या झाडाला २५० रुपये, तर प्रत्येक नुकसान झालेल्या सुपारीच्या झाडासाठी ५० रुपये देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बागायतदारांना आर्थिक मदत मिळण्यातील मोठी अडचण दूर झाली आहे.

नारळ आणि सुपारीसाठी प्रत्येक झाडामागे मदत मिळण्याची आमची मागणी होती. ती सरकारने मान्य केल्याने आता बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक आहे. प्रशासकीय पातळीवरून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

निसर्ग वादळामुळे नारळ आणि सुपारीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. प्रशासनाकडे रक्कमही जमा झालेली आहे. लवकरच लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

नारळाचे एक झाड वर्षाला सुमारे ७ हजार रुपयांचे उत्पन्न देते. सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. उद्ध्वस्थ झालेला बागायतदार अशा मदतीने वर येणार नाही. - जीवन लोहार, बागायतदार, चौल

टॅग्स :RaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार