शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

दरडग्रस्तांसाठी ११८ कोटी!

By admin | Updated: July 20, 2015 03:27 IST

अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळून दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबे बेघर झाली होती

महाड : अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळून दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबे बेघर झाली होती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या भूगर्भतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाड व पोलादपूर तालुक्यांतील ४८ गावांना दरडींचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरडींचा संभाव्य धोका असलेल्या सर्व ठिकाणच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता असून यासाठी ११८ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.या प्रस्तावानुसार महाड तालुक्यात ३४ तर पोलादपूर तालुक्यात १४ गावे दरडग्रस्त असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा (१३० घरे, १३० कुटुंबे), नडगावतर्फे बिरवाडी-काळभैरवनगर (३५ घरे, ७० कुटुंबे), रायगडवाडी-हिरकणीवाडी (६० घरे, ८५ कुटुंबे), सव (८४ घरे, १०५ कुटुंबे), लोअरतुडीत नागोली कोंड (३५ घरे, ५५ कुटुंबे), जुईबुद्रुक (७० घरे, ९० कुटुंबे), कुंबळे (९५ घरे, ११० कुटुंबे), वराठी-वराठी बौध्दवाडी (३५ घरे, ३५ कुटुंबे), कोसंबी (२५ घरे, ४० कुटुंबे), वलंग (१६५ घरे, १९५ कुटुंबे), रोहन (३५ घरे, ५५ कुटुंबे), खैरे तर्फे तुडील आदिवासीवाडी (२५ घरे, ४० कुटुंबे), मोहोत (२२ घरे, २२ कुटुंबे), सह्याद्रीवाडी आंबेशिवथर (१९ घरे, १९ कुटुंबे), पारमायी (५७ घरे, ५७ कुटुंबे), माझेरी (४० घरे, ४० कुटुंबे), कुर्ते दंडवाडी (२२ घरे, २३ कुटुंबे), आंबिवली पानेरीवाडी (२३ घरे, २५ कुटुंबे), मुठवली (१०६ घरे, १५० कुटुंबे), कडसरी लिंगाणा (६ घरे, ९ कुटुंबे), मांडले ज्ञानेश्वर वाडी (१७ घरे, २५ कुटुंबे), चोचिंदे कोंड (६० घरे, ८० कुटुंबे), वाकी बुद्रुक नाणेमाची (२७ घरे, ८१ कुटुंबे), कोथेरी जंगमवाडी (२८ घरे, २८ कुटुंबे), पिंपळकोंड (८ घरे, ८ कुटुंबे), शिंगरकोंड-मोरेवाडी (९ घरे, १० कुटुंबे), कोंडीवते-जुना गावठाण (३८ घरे, ४० कुटुंबे), रावतळी सोनघर (३३ घरे, ३५ कुटुंबे), मुमुर्शी आंब्याचा कोंड (३३ घरे, ३६ कुटुंबे), मुमुर्शी बौध्दवाडी (११ घरे, ११ कुटुंबे), तर पोलादपूर तालुक्यात लोहारे चव्हाणवाडी (२२ घरे, ३५ कुटुंबे), सवाद, कालवली, चरई भोईआळी-सोनारआळी, पोलादपूर सिध्देश्वर आळी- खालची बाजारपेठ-सावित्रीनगर, भोगा व येलंगेवाडी, कोतवालखुर्द , क्षेत्रपाल आमलेवाडी, परसुले धनगरवाडी, कोतवाल बुद्रुक संकपाळवाडी, कोंढवी मूळगाव, तुटवली, केवनाळेआंबेमाची या गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याने तेथील कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा महसूल विभागाचा प्रस्ताव आहे. (वार्ताहर)