शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

APMC कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांना ११००० पर्यंत लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2023 19:16 IST

दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते  २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. 

मधुकर ठाकूर

उरण: येथील एपीएमसी कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणारे २०० कामगारांच्या वेतन वाढीच्या करारावर सोमवारी (३१) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते  २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. 

 येथील एपीएमसी (ओल्ड मर्स्कस) कंपनीत फ्युचर टफिंग,सोल्युशन,पिनाकल ,सेव्हन स्टार , सेक्युरिटी ॲण्ड फाईव्ह स्टार आदी कंपन्या ठेकेदारी पध्दतीवर काम करीत आहेत.या ठेकेदार कंपन्यांमध्ये ऑपरेटर, सव्हेअर आणि लेबर असे मिळून सुमारे २०० कामगार काम करीत आहेत.कामगारांना वेतनवाढीच्या बरोबरच विमा,बोनस आणि आवश्यक सोयीसुविधा आणखी लाभ मिळावा यासाठी दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष भुषण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील युनिटच्या पदाधिकाऱ्यांचा व्यवस्थापनाकडे  पाठपुरावा सुरू होता.संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर व्यवस्थापनाने  वेतनवाढीचा करार करण्यासाठी तयारी दर्शवली होती.

अखेरीस सोमवारी (३१) दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि एपीएमसी व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढीचा करार संपन्न झाला. वेतनवाढीच्या कराराप्रसंगी एपीएमसीच्या ऑल इंडिया युनिटचे इन्चार्ज चिराग जगड,आयआर योगेश ठाकूर, विविध ठेकेदार कंपन्यांचे संतोष कुमार, शेखर तांडेल तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष भुषण सामंत, उपाध्यक्ष रोशन ठाकूर, जनरल सेक्रेटरी वर्गीस चाको आदी उपस्थित होते.

व्यवस्थापन आणि संघटनेत सोमवारी  (३१)  पुढील तीन वर्षांसाठी झालेल्या वेतन वाढीच्या करारानुसार पहिल्या टप्प्यात ५० टक्के, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कामगारांना २५-२५ टक्के वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.या वेतनवाढीच्या करारामुळे ऑपरेटर - ११०००, सर्व्हेअर--९००० आणि लेबर- ८००० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.तसेच तीन लाखांचा विमा संरक्षण,बोनस आणि इतर आवश्यक सोयी सुविधांबरोबरच कॅन्टीन फॅसिलिटीमध्ये ९० टक्के सबसिडीचा लाभ मिळणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष रोशन ठाकूर यांनी दिली. तीन वर्षांच्या वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण