शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०० कोटींचा पथदर्शी प्रकल्प

By admin | Updated: March 12, 2017 02:19 IST

केंद्र शासनाच्या ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या अंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेट सेवेद्वारे जोडून हायटेक करण्याचा निर्णय

- जयंत धुळप,  अलिबाग

केंद्र शासनाच्या ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या अंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेट सेवेद्वारे जोडून हायटेक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना राबविण्याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. योजनेंतर्गत राज्यातील नागपूर व रायगड या दोन जिल्ह्यांची पथदर्शी प्रकल्पाकरिता निवड करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात १०० कोटींचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या वेळी त्यांच्यासमवेत रायगड बीएसएनएलचे उप महाव्यवस्थापक सी.व्ही. राव उपस्थित होते.बीएसएमएलच्या माध्यमातून जिल्ह्यातील बँका, विविध शासकीय कार्यालये यांना गतिमान इंटरनेट सेवा देण्यात येत आहेच; परंतु ‘एनओएफएन’ योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय-प्रांताधिकारी कार्यालय - तहसील कार्यालय -मंडळअधिकारी अशी संपूर्ण महसूल यंत्रणा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय - उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय - पोलीस स्टेशन अशी पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी -गटविकास अधिकारी - ग्रामपंचायत अशी जिल्हा परिषदेची यंत्रणा गतिमान इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाइन जोडली जाणार आहे. ११४ ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रत्यक्ष उपलब्ध ‘एनओएफएन’ योजनेंतर्गत रायगड जिल्ह्याचा पहिला टप्पा ४० कोटी रुपये खर्चाचा असून, त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ८२५ ग्रामपंचायती हायटेक करण्याचे काम रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून प्रगतीपथावर असून, ११४ ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करुन देण्यात रायगड बीएसएनएलने यश मिळविले असल्याची माहिती रायगड बीएसएनएलचे उप महाव्यवस्थापक सी.व्ही. राव यांनी दिली.