शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसाठी १ लाख १ हजारांचा निधी

By admin | Updated: March 5, 2017 02:40 IST

आजकाल राजकारणी वा नेते मंडळीकडून जन्मदिनानिमित्त लाखो रुपये खर्च करून बॅनर्स, पाट्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते

- जयंत धुळप,  अलिबाग

आजकाल राजकारणी वा नेते मंडळीकडून जन्मदिनानिमित्त लाखो रुपये खर्च करून बॅनर्स, पाट्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दत्ता पाटील यांचे चिरंजीव आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे. अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्वउत्पन्नातून १ लाख १ हजारांचा भौतिक सुविधा विकास निधी कोकण एज्युकेशन सोयायटीच्याच एका शाळेस देण्याची आगळी परंपरा संदीप यांनी निर्माण केली आहे. यंदा दत्ता पाटील यांच्या ९१व्या जयंती दिनी अलिबाग तालुक्यांतील परहूरपाडा येथील धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरला किणी यांना या निधीचा धनादेश कोएसोचे नूतन संचालक सिद्धार्थ संजय पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.कोएसाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण केल्यावर आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कार्यवाह अजित शाह, जनता शिक्षण मंडळाच्या संचालक शारदा धुळप, कोएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, कोएसो माध्यमिक शाळा प्रशासन अधिकारी कृष्णा म्हात्रे व अशोक गावडे, कोएसो प्राथमिक शाळा प्रशासन अधिकारी संजीवनी जोशी, कोएसो इंग्रजी माध्यम शाळा प्रशासन अधिकारी अनीता पाटील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास डोळ्यासमोर ठेवून अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी मोठे काम केले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून त्यांच्या जन्मदिनी २0१२ या वर्षापासून कोकण एज्युकेशन सोसायटीतील एका शाळेला मूलभूत, भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी रु १ लाख १ हजारांचा निधी स्वउत्पन्नातून देण्याचा संकल्प सुरू केल्याचे संदीप यांनी सांगितले. भौतिक सुविधा विकास निधीचे यंदाचे सहावे वर्षसंजय दत्ता पाटील यांच्या संकल्पानुसार भौतिक सुविधा विकास निधीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. २०१२मध्ये कोएसो मांडला माध्यमिक शाळा (महाड), २०१३मध्ये कोएसो प्रभाकर पाटील मा. शाळा, काळसुरी (म्हसळा), २०१४मध्ये कोएसो गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, वाकी (महाड), २०१५मध्ये कोएसो नारायण गायकर मा.शा., वळके (मुरुड), २०१६मध्ये को.ए.सो. माध्यमिक शाळा, माणकुले (अलिबाग) तर यंदा या संकल्पांतर्गत को.ए.सो.धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा, परहूरपाडा (अलिबाग) या शाळेस रु. १ लाख १ हजारांचा निधी देण्यात आला आहे.