शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

राज्यात झीरो पेंडेन्सी राबविणार, एक कोटीहून अधिक फायलींचा निपटारा - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:07 IST

पुणे महसूल विभागात गेल्या तीन महिन्यांत ‘झीरो पेंडन्सी’च्या माध्यमातून एक कोटींहून अधिक फायलींचा निपटारा झाला आहे. यापुढे संपूर्ण राज्यभरात झीरो पेंडन्सी राबवणार असून त्यासंदर्भातील शासननिर्णय लवकरच काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

पुणे : पुणे महसूल विभागात गेल्या तीन महिन्यांत ‘झीरो पेंडन्सी’च्या माध्यमातून एक कोटींहून अधिक फायलींचा निपटारा झाला आहे. यापुढे संपूर्ण राज्यभरात झीरो पेंडन्सी राबवणार असून त्यासंदर्भातील शासननिर्णय लवकरच काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत पाच मजली पर्यावरणपूरक इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्र्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.नव्या वास्तूत जाणे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, कामाची गती वाढणेही गरजेचे आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी बांधील आहोत. त्यामुळे प्रशासकीय कामाची गती वाढली पाहिजे. सरकारी कार्यालयांमध्ये व्यवस्थेबरोबरच आस्था असली पाहिजे. झीरो पेंडन्सीबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन सर्व विभागांमध्ये स्पर्धा घेऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही भूकंपरोधक आहे, याचा उल्लेख करुन केवळ शासकीय इमारती भूकंपरोधक ठेवू नये तर प्रशासन सुध्दा भ्रष्टाचारमुक्त ठेवावे. राजकीय पक्षांपुढे विश्वासार्हता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासकीय व्यवस्थेलासुद्धा आपली विश्वासार्हता दाखवावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस