शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचा असंतोष रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 04:13 IST

रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड नंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही गुरुवारी विद्यार्थ्यांनी लक्षणीय मोर्चा काढला.

पुणे : रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड नंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही गुरुवारी विद्यार्थ्यांनी लक्षणीय मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांची सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर व्यापक लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.शनिवारवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी मोर्चात सहभागी झाले होती. आम्ही अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे; मात्र आयोगाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने केला. पदांमध्ये वाढ करावी, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीसारखी पीएसआय, सीटीआय आणि एसओची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी, केंद्रावर मोबाईल जॅमर बसविण्यात यावेत, प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी न लावता तमिळनाडू पॅटर्न राबवावा, तलाठी पदाची परीक्षा एमपीएससीद्वारे घेण्यात यावी, डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआयमार्फत करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहे.