शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तरुणास लुटले, गुन्हा दाखल : वाघापूर चौफुला येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:43 IST

वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथील हॉटेल पुष्कराजसमोर गुरोळी येथील तरुणास शिंदवणे (ता. हवेली) येथील ८ जणांनी बेदम मारहाण करून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

जेजुरी : वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथील हॉटेल पुष्कराजसमोर गुरोळी येथील तरुणास शिंदवणे (ता. हवेली) येथील ८ जणांनी बेदम मारहाण करून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबद्दल जेजुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी अर्जुन राजू खेडेकर (रा. गुरोळी, ता. पुरंदर) जाहिरात व्यावसायिक असल्याने त्यांचे हडपसर येथे कार्यालय आहे. ते दररोज शिंदवणेमार्गे हडपसरला कामानिमित्त जात-येत असतात. गुरुवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाटमार्गे वाघापूरला येत असताना शिंदवणे घाटात एका मोटारीने त्यांचा पाठलाग करीत दोन वेळा त्यांच्या गाडीला दाबण्याचा प्रयत्न केला. गाडीत एकटाच असल्याने घाबरलेल्या अर्जुन खेडेकर यांनी गाडीचा वेग वाढवून थेट वाघापूर चौफुला येथील हॉटेल पुष्कराज गाठले. मागून येणारी आय २० मोटार पाठलाग करीत या ठिकाणी आली. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वाहने दाबण्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी आरोपीने नवनाथ महाडिक माझे नाव असून माझ्या नादाला कोणी लागत नाही, असे म्हणत मित्रांना बोलावून घेतले. पाचच मिनिटांत त्या ठिकाणी एक मोटार आली, तसेच त्यातून सहा-सात जण उतरले. त्यांनी खेडेकर यांस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर फिर्यादीच्या खिशातील ६५ हजार रोख आणि दीड तोळ््याची सोन्याची चेन असा सुमारे १ लाख २ हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेतला. हॉटेलसमोरच मारहाण होताना हॉटेलचा मालक राकेश शितोळे बघ्याची भूमिका घेऊन गप्प उभा होता. मारहाण करणाºयांना स्थानिक लोकांनी ओळखले असून नवनाथ महाडिक, जगदीश जालिंदर महाडिक, प्रदीप शहाजी महाडिक, ओम शिवाजी महाडिक, प्रकाश महाडिक, पप्पू महाडिक, शिवाजी कुंजीर, गोट्या शिंदे (सर्व जण रा. शिंदवणे, ता. हवेली) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा