शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या पूर्ततेसाठी तरुणांनी जागृत व्हावे - विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:41 IST

विजय शिवतारे : भिवरी परिसरात १ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

गराडे : ऐतिहासिक पुरंदर तालुक्याला गौरवशाली परंपरा आहे; परंतु राजकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पुरंदरचा विकास झाला नाही. मला मिळालेल्या मंत्रिपदामुळे तर कोट्यवधीचा निधी तालुक्यात खेचून आणला, तर नियोजित विमानतळालाही विरोधक प्रखर विरोध करीत आहे. मात्र, विमानतळामुळे पुरंदरचा सर्वांगीण विकास होणार आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यामुळे पुरंदरकरांनी विशेषत: तरुणांनी विमानतळ होण्यासाठी जागृत व्हावे, असे आवाहन जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

नाटकरवाडी ( ता.पुरंदर) येथील तुळजाभवानी मंदिरात नाटकरवाडी रस्त्याच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते शिवतारे बोलत होते. यावेळी पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय काळे, जि. प. सदस्या ज्योती झेंडे, माजी सभापती दादासाहेब घाटे, उद्योजक अनिल जगताप, हरीभाऊ लोळे, शिवसेना नेते विजय ढोणे, अनिल ढवळे, रामदास कटके, दादासाहेब घिसरे, महादेव फडतरे, प्रकाश कटके, संजय कटके, निखिल गायकवाड, रघुनाथ कटके, सरपंच काजल गायकवाड, उपसरपंच श्रीकांत येळवंडे, माजी उपसरपंच भाऊसाहेब कटके, तानाजी कटके, रघुनाथ ढवळे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी लोणकर, प्रकाश चौधरी, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे आदीसह सिद्धेश्वर तरुण मंडळ व हरहर महादेव कावड मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बापदेव घाट ते बोपगाव रस्ता - १ कोटी २० लाख,भिवरी ते नाटकरवाडी रस्ता - ३० लाख,आस्करवाडी फाटा ते आस्करवाडी रस्ता -२० लाख,भिवरी स्मशानभूमी - ६लाख असे१ कोटी ७६ लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमीपूजन ना.शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. दत्तात्रय काळे , ज्योती झेंडे यांनी भाषण केले.प्रास्तविक सखाराम कटके यांनी केले. सुत्रसंचालन नाथाभाऊ कटके व नवनाथ नाटकर यांनी केले.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नाटकरवाडीला रस्तादेश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली. परंतु पुणे शहरालगत असणाऱ्या नाटकरवाडीसारख्या वाडीला रस्ता नव्हता. त्यामुळे यापूर्वीच्या सत्ताधाºयांनी काय केले हेच समोर येते. त्यावरून नाटकरवाडीकरांनी कोणती माणसे कामाची आहेत व कोणती बिनकामाची हे लक्षात घेतले पाहिजे असा टोलाही विजय शिवतारे यांनी लगावला.

अजित पवारांप्रमाणे पुरंदरमध्ये मला मतदान कराबारामतीमध्ये अजित पवार यांना तेथील मतदार भरभरून एकहाती मतदान करतात. यापुढे पुरंदर- हवेलीतील विकासकामांच्या जोरावर येथील मतदारांनी मला विक्रमी मतदान करावे. त्याआधी सासवड येथील ज्या बाजार समितीची जागा धनदांडग्यांनी बळकाविल्या आहेत. त्यांना तेथून हुसकाविण्यासाठी मी प्रयत्न करतो आहेच त्यासाठी जनतेनेदेखीलआवाज उठवावा. 

टॅग्स :Puneपुणे