शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

युवकांनी आगीत शिरून वाचविले गर्भवतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:06 IST

आगीत सारे काही भस्मसात होत असताना दोन युवकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या गर्भवती महिला व चिमुकलीचे प्राण वाचविले.

केडगाव : इमारतीला लागलेली भीषण आग.. एक गर्भवती महिला, तिच्यासोबत एक चिमुकली त्यात अडकलेली... आगीत सारे काही भस्मसात होत असताना दोन युवकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या गर्भवती महिला व चिमुकलीचे प्राण वाचविले. प्राणांची शर्थ करून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या युवकांनी माणुसकीचा आदर्श त्यांनी घालून दिला.केडगाव (ता. दौंड) येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत २० लाख रुपयांचे सामान भस्मसात झाले. स्वातंत्र्यदिनाच्या आधी दुपारी २ युवकांनी जीव धोक्यात घालून एक गर्भवती महिला व चिमुकलीला शिताफीने वाचविले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. केडगाव येथील गजबजलेल्या बाजारपेठेत नाज या दुकानाच्या तळमजल्यावरून धुराचे लोट दिसू लागले. हे दुकान हरुण आतार यांचे आहे. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी. पत्नी आजारी असल्याने त्यांना घेऊन बाहेरगावी गेले होते. त्यांचा मुलगाही बाहेरगावी गेला होता. आगीने रुद्रावतार धारण केला. त्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरू झाली. काही तत्पर व जागरुक नागरिकांनी स्वत:चे पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही आग विझण्याऐवजी भडकत होती. या वेळी ग्रामस्थांपैकी काहींना या इमारतीत कोण अडकले का? अशी शंका आली. आतार यांचे कुटुंब तिसºया मजल्यावर असण्याची शक्यता वर्तविली. गर्दीतील नितीन शेळके व इरफान तांबोळी हे दोन युवक पुढे सरसावले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शेजारील घराच्या टेरेसवर गेले. या इमारतीवरून उडी मारून दोघे जण आग लागलेल्या इमारतीच्या तिसºया मजल्यावर आले. एव्हाना धुराचे लोट या मजल्यावर पोहोचलेले होते. आतून एका महिलेचा आवाज आला. या युवकांनी येथील आतार यांच्या स्नुषा खुशबू व त्यांची ३ वर्षांची चिमुकली हिला तत्काळ घरातून बाहेर काढले. धुरामुळे चिमुकली बेशुद्ध झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री मालक हरुण आतार यांनी फिर्याद दिली.>मोलाची मदत : काही मिनिटांत अग्निशमन दल हजरग्रामस्थांनी तातडीने कुरकुंभ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दल आल्यानंतर आग आटोक्यात आली. मदतीसाठी पोलीस हवालदार शशिकांत वाघ, डॉ. संदीप देशमुख, सतीश गुंदेचा, संजय हंडाळ, राजेंद्र शेळके, रविकांत जराड, मनोज गुंदेचा, अतुल पाटील, अझर इनामदार, मोमीन शेख, नावीद आतार, नितीन जगताप, किशोर निंबाळकर, साजिद शिकीलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.